पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१८] पै॥ छ २६ मोहरम ॥ श्री ॥ १६ नोव्हेंबर १७५३. पंतप्रधान पुरवणी श्रीमंत राजश्री स्वामीचे सेवेसी: कृतानेक विज्ञापना मुसाबुसी सेनकाजवळ बोलिले की नवाब सलाबतजंग यांहीं रुकुनुदौला यांचे मसलहतीने आमचा गिल्ली गोरंदोर यास बहुत लिहिला की मुसाबुसी यांही आमचा मनसबा खराब केला; मुलुक गनीमास दिधला; गनीमाचा घावडाव यांस कळत नाहीं; गनीमास दबाऊन हालखुद राखावें तेव्हां गनीम रास येतील; राव प्रधान यांस येक सुबा दरोबस्तव आणिखी मुलुक दिधला. याजकरितां मुसाबुसी यांस खुबवजा ताकीद करून रवाना करावें ह्मणोन कैवजां लिहिले. आह्मांवर येतराजी व्हावी आह्मी फिरोन न यावें, ऐसाच सलाबतजंग व रुकुनदौला यांचा मनसबा होता. आतां आमचे गोरंदोर थोर. त्यांस सारा मजकूर उमजला होता. सबब त्यांहीं जबाब लेहून पाठविला की मुसाबुसी आहेत ते आमचे बेटे आहेत. त्यांहीं राव प्रधान यांसी सुलुख केला तो तुमचे रजामंदीने जाणोनच केला. त्यांहीं जें केलें तें फिरत नाही. तुही त्यांचे कराराप्रमाणे राव.७४ भालकीच्या लढाईपासून मुसाबुसीचे वजन निजामाचे दरवारांत अती वाढले. सर्व तहरह बुसीने करावें असें झालें. पेशव्यांशी तह करण्याचा वेळ आला त्यावेळी बुसीने पेशव्यांस निजामच्या राज्यांतील सबंद एक सुभा दिला. त्यामुळे निजाम फारच हलका झाला. निजामाला हलका करावा हा बुसीचा बेतच होता. तोच बेत नानासाहेब पेशव्यांचाहि होता. ह्या दोघांनी गुप्त तह करून निजामाला पुष्कळच बुचाडिलें. तेव्हां निजामानें डुप्लेकडे अर्ज केला; परंतु बुसी डुप्लेच्याच मताने चालत असल्यामुळे, डुप्लेने बुसीस सभाळून घेतले व ह्यापुढे अशा तक्रारी आणूं नयेत ह्मणून वरती आणखी धमकी दिली. येणेप्रमाणे निरुपाय होऊन सलाबतजंगाला बुसीची खुशामत करणे भाग पडले. ही खुशामत वरकरणी होती हे जाणून बुसी अ.पले वरिष्ठ दर्जाचे यजमान व स्नेही जे नानासाहेब पेशवे त्यांच्यापाशी मोगल लोकांच्या लुच्चेगिरीचें व फ्रेंच लोकांच्या सचोटीचे वर्णन ह्या पत्रांत करीत आहे.