पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

cc पत्राची थैली दिली ते जासुदाबराबर सेवेसी पाठविली आहे. सेवेसी श्रुत जालें पाहिजे हे विज्ञापना. कमीखानांहीं सेवकाची व गजफरजंग याची भेट केली आण घरी आले. आजारी पडिले आहेत. अद्याप बाहेर निघाले नाहीत. जाबसालासमई हाजीर नव्हते. सेवेसी श्रुत जाले पाहिजे हे विज्ञापना. मुजफरखान गाडदी यांहीं मुसाबुसी यांस पत्र पाठविले होते, त्याचे उत्तर म॥रनिले येही लेहून सेवकाजवळ रवाना करावयास दिधलें तें रवाना केले आहे. मुजफरखानास प्रविष्ट होय ते आज्ञा करावयास स्वामी समर्थ आहेत. हे विज्ञापना. - - - EIVSHRESTHA [१७] पै॥ छ २६ मोहरम. ॥ श्री ॥ १६ नोव्हेंबर १७५३. पंतप्रधान श्रीमंत राजश्री स्वामीचे सेवेसी: विनंति सेवक रघुनाथ गणेश चरणावरी मस्तक ठेऊन स॥नमस्कार कृतानेक विज्ञापना. स्वामीचे कृपादृष्टीने सेवकाचें वर्तमान त॥छ २० माहे मोहरम पावेतों यथास्थित असे. येथील वर्तमान त॥ छ १३ मोहरम सविस्तर विनंतिपत्रीं लिहून जासूदजोडी सेवेसी पाठविली. त्या विनंतिपत्रावरून सविस्तर वृत्त सेवेसी विदित होईल. मुसाबुसी मजलदरमजल छ १९ मोहरमी राक्षसभुवनास गौतमीचे उत्तरतीरी मुकामास आले. छ १८ रोजी गेवराईचे मुकामीं नवाब सलाबतजंगांहीं सीतुरस्वार पाठविला; मुसाबुसी यांस लिहिले की जलद येऊन पोहचणे. मुसा मरलो फरासीस दहा स्वारांनसी हैदराबादेहून दोन मजला करून भालकीवर मुसाबुसी याजवळ ७२ ज्याने भाऊसाहेबांस पुढे मारण्याचा प्रयत्न केला तो मुजफरखान हाच. कुकडी नदीवर लढाई झाल्यानंतर मुजफरखान पेशव्यांच्या नोकरीस राहिला.