पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

THORI पाहिजे; काय ल्याहावें ? सेवक बोलिला की आमास पुसता तर इतकें ल्याहावें की आह्मी दूरदस्त होतों; मागें कितेक वसवासाच्या गोष्टी जाल्या; याजकरितां आह्मी रावसाहेबांस लेहून वकील आणविला. वकील आलियावर रावसाहेबांचे तर्फेनें कितेक वसवास होता तो दूर झाला याजवरून संतोषी जाले. बोलिले की याप्रमाणे लिहितों, व बोलिले की औरंगाबाजेहून सफीउल्लाखान व परशरामपंत ऐसे थालनेरास रावअजम रघुनाथराव यांजकडे जाबसालास गेले आहेत. तुझी रावसाहेबांस लिहून पाठवावें की साहेबी रावअजम रघुनाथराव यांस लिहून पाठवावें कों मोगलाकडून जाबसालास वकील आले आहेत, त्याजजवळ जाबसाल न करावा. नवाब गजफरजंग मुसाबुसी यांचे मारीफत जाबसाल करावा लागतो. · तह त्यांचे मारीफत जाला ह्मणून लिहून पाठवून जाबसाल मौकूफ करवावा. आमीहि नवाब सलाबतजंग व रुकुनुदौला यांस लिहितों की आह्मी रावसाहेबांस लिहून रघुनाथराव यांस लेहविलें की जाबसाल करणे तो गजफरजंग यांचे मारिफत करावा लागतो. त्याचे मारिफत जाबसाल होईल. शहराहून जावसालास वकील आले असतील त्यामारिफत त्याजवळ जाबसाल न करावा. त्याप्रमाणे तिकडून आमचे मारीफतीखेरीज जाबसाल होणार नाही. तुह्मीहि याप्रमाणेच अमलांत आणावें. आह्मी औरंगाबाजेस आलियावर जें करणें तें करूं ह्मणोन लिहून पाठवितो. आह्मीं आपले मारीफतीखेरीज कोण्हाचे चालों देत नाही. मध्ये कोणी जो दिगर करील त्यास तंबी करूं ह्मणोन बोलिले. त्याजप्रमाणे सेवेसी विनंति लिहिली आहे. मुसाबुसी येथून विजयादशमी जालियाउपर कुच करितील. कुच करून निघालियावर स्वामीचे दर्शनलाभास यावे हा त्यांचा इरादा आहे. सेवेसी श्रुत जाले पाहिजे हे विज्ञापना. मुसाबुसी यांही सेवेस ७० रघुनाथराव हिंदुस्थानांत जाण्याकरितां अमदाबादहून १७५३ च्या भाद्रपदांत म्हणजे सप्टंबरांत थालनेरास आले होते. ७१ ह्यावेळी बुसीने सलाबतजंगाला अगदीच संपुष्टांत आणिलें होतें. सर्व तहरह बुसीच्या मार्फत झाले पाहिजेत इतकी व्यवस्था झाल्यावर निजाम फ्रेंच लोकांचा अंकित झाला नाही असे कोण न म्हणेल ?