पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। ४७ की नसीरजंगांनी आझांस लिहिले आहे की सालमजकुरी आमास पेशक सीच्या ऐवजाकरितां श्रीरंगपट्टणास जावे लागते. सरकारांत खजाना नाही. सीबंदीस ऐवज पाहिजे. याजकरितां श्रीरंगपट्टणास जाऊन ऐवज आणून सरंजाम करावा लागतो हणोन लिहिले आहे. हे वर्तमान तुह्मी रावसाहेबांस लेहून पाठविणे. त्याजवरून सेवेसी विनंति लिहिली आहे. सेवक बोलिला की रावसाहेबांचा ऐवजहि पट्टणवाले याकडून येणें आहे. सालगु॥ पेशजीची बाकी होती त्यापैकी काही ऐवज आणिला. सेवेसी विदित जाले पाहिजे हे विज्ञापना. ॥श्री॥ पु॥ श्रीमंत राजश्री स्वामीचे सेवेसी: पंतप्रधान कृतानेक विज्ञापना. छ १८ जिलकादी दोन प्रहरां नवाब गजफरजंग मुसाबुसी यांचे भेटीस गेलों ते समयीं सरकारचे पत्राचे जाब तयार करून थैली करून सेवकाजवळ रवानगीस दिली. ते समईं बोलिले की आमास रुकुनुदौली नसिरजंग यांही पत्र पाठविलें तें तुह्मी आइकिलें आहे; त्याची नक्कल रावसाहेबांस पहावयास पाठवितों. सेवक बोलिला की उत्तम आहे. मग तेच समई अबदुल रहिमानखान येही त्या पत्राची नक्कल करून सरकारचे थैलीत घालून सेवकाजवळ दिली व बोलिले की तुही रावसाहेबांजवळोन आलेस, हें वर्तमान नवाब सलाबतजंग व रुकुन्दौला नसिरजंग यांस कळलें असेल व लोकांचे लिहिलेयावरून कळेल, परंतु आमास लिहिले ६९ ह्यांनाच धाकटे नासीरजंग म्हणण्याची चाल असे. थोरले नासीरजंग १७५० च्या डिसेंबरांत मारले गेले.