पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पना. छ १३ जिलकादी रुमीखान नवाबाजवळोन आपले घरास आले. त्यांस शरीरी विकृती जाली. यास्तव छ १४ जिलकादी खलवतांत बोलीचे प्रसंगी खान म॥रनिले दरबारास आले नव्हते. नवाबाचे मुनशी अबदुल रहिमानखान मात्र होते. छ १४ जिलकादी अगोदर दीनानाथपंत नवाबाजवळ गेले होते. सेवकांस पाचारणे आलियावर गेलो. सेवेसी वि॥ व्हावयाकरितां वि॥ लि॥आहे. हे विज्ञापना. [१५] ॥ श्री॥ १५ सप्टेंबर १७५३. पंतप्रधान पुरवणी श्रीमंत राजश्री स्वामीचे सेवेसी: कृतानेक विज्ञापना. छ १६ जिलकादी दोन प्रहरां राजश्री दीनानाथ गोविंद व सेवक ऐसे नवाब गजफरजंग यांचे मुलाजमतीस गेलो. छ १४ जिलकादी बोली जाली ते मजकूर अलाहिदा विनंतिपत्राचे पुरवणींत लिहिले आहेत. ते पत्र त्यांस अक्षरशा सार्थ वाचून दाखवून समजाविलें. अबदुल रहिमानखान मुनसी समीप होते. पत्र आइकोन बहुत संतोष पावले. बोलिले की ज्याप्रमाणे तुझी आह्माजवळ बोलिलेस व त्याचे जबाबांत आमी तुह्माजवळ बोलिलों तेच मजकूर येक जरा तफावत न करितां कलमबंद केलें; सदईप्रमाणे आमचा करार आहे ह्मणोन रावसाहेबांस लिहिणे. आणीक बोलिले की कर्नाटक नवाब सलाबतजंगांही आमचे खावंदास दिधलें; आहीं आइकतों की रावसाहेब महमद अल्लीखानाची कुमक करणार; कर्नाटकांत ६५ १७५३ च्या प्रारंभास सलाबतजंगाने डुप्लेला कर्नाटकचा नवाब नेमिलें व महमद मल्लीला काढून टाकिलें. महमदअल्लीच्या बाजूला इंग्रज होते. महमदअल्लीच्या विरुद्धपक्षाला निजामाची मदत होती तेव्हां अर्थात् महमदअल्लीची बाजू नानासाहेबांनी घेतली. या पत्रांत बुसी जिचा उल्लेख करतो ती होळीहोन्नूरची स्वारी होय.