पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खुरसीवर सातआठेक पत्रांच्या थैल्या होत्या त्या हाती बेऊन दाखविल्या. बोलिले की आमांस रावसाहेबांजवळ प्रपंच नाही. इतकें बोलिले. मग विडे दिधले. अत्तर लाविला; गुलाबदानी स्वहस्ते घेऊन गुलाब सेवकाच्या आंगावर घातला. ते समयीं सेवकास चार वस्त्रे-येक दुलोसी चिराव, गोशपेश व पटका सफेद दुलोसी किनारेयाचा व महमुदी जरीबुटेयाचा-ऐशी दिली. नवाबाने आपले खजमतगाराजवळ देऊन सेवकाचे बिराडी पोंचवावयास सांगोन रुखसत केले. उभयतां सेवक निघोन शहरामध्ये बागांत बंगला आहे ते स्थळ सेवकास नेमिलें. तेथे येऊन राहिलो. दिनानाथपंत आपले बिराडास गेले. तदनंतरें घटकादोहोंनी खासा रुमीखान पालखीत बसोन सेवकाजवळ आले. पांचशे रुपये नवाबाने जियाफत मेजवानी पाठविली ते सेवकास दिधली. विडे घेऊन गेले. छ १३ जिलकाद बुधवार पौर्णिमा भेटीस जावें तों नवाबाने सांगोन पाठविलें की आज दिवस फटकाळ आहे. उदैक भेट होईल. याजकरितां भेटीस न गेलो. छ १४ जिलकादी गुरुवारी दोनप्रहरां सेवकास चोपदार पाठवून बोलावून नेले. दिनानाथपंतहि होते. भेटीनंतरें जाबसाल जाले ते अलाहिदा पुरवणीचे विनंतिपत्रीं लिहिले आहेत त्याजवरून सेवेसी विदित होतील. सेवेसी श्रुत होय हे विज्ञा दिसतें. १७५२ सालापासून बुसीचे वजन निजामाच्या दरबारी पराकाष्ठेचे वाढले होते. फार काय, तोच तेथील मुख्य सूत्रधार होता. बुसी जर पंधरा वीस वर्षे निजामाच्या दरबारी रहातां व लालीनें बेवकूवपणाने त्याला परत बोलाविलें नसते व पारिस येथील त्यावेळच्या मुत्सद्यांनी लालीच्या कृत्याला अनुमोदन दिले नसते, तर फ्रेंच लोकांच्या राज्याची हिंदुस्थानांत सध्या आहे ह्याहून शतपट जास्त मर्यादा असती. बुसीने नानासाहेब पेशव्यांकडेहि संधान बांधिले होते. परंतु नानासाहेबांच्या अलौकिक मुत्सद्देगिरीपुढें बुसीला नमूनच वागावे लागे. गाजुद्दिसान मेल्यावर व भालकीची लढाई झाल्यावर सलाबतजंगाला पेशव्यांशी तह करावा लागला. त्यांत मुसाबुसीने पेशव्यांस निजामाचें नुकसान करून नानासाहेबांचे प्रेम संपादण्याकरितां एक सबंद सुभाच्या सुभा देवविला. इतकें झाल्यावर बुसीशी वरकरणी प्रेम दाखविण्यास पेशव्यांनी यत्किचिहि कमी केले नाही. शेवटी बुसीची अंतस्थ भूतृष्णा केवढी आहे हे नानासाहेबांनी ओळखून, त्याला निजामाच्या दरवारांतून वर्षादी डवर्षांत पिटाळून लाविलें.