पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

फौज पाठवणार; याजकरितां रावसाहेबांस ल्याहावें की महमदअल्लीखान तगीर. सनद आमचे खावंदास जाली. मुलुक आमचे हाताखालें आला. महमदअल्लीखानाकडे त्रिचनापल्ली व अर्काट मात्र आहे. त्याजवळ फौज नाहीं. सर्वा गोष्टींनी अजीज आहे. रावसाहेबांची आमची दोस्ती. रावसाहेबी येक गुमास्ता आमचे खावंदाजवळ पाठवावा. चौथ सरदेशमुखीचा पैका होईल तो आह्मी देऊ. याजमुळे मुलुक आबाद राहील. दुतर्फा किफायत आहे. महमदअल्लीखानास आमचा वसवाद असिला तर आपण त्यास कौल देऊन बोलवावें. आह्मी नवाब सलाबतजंगाजवळोन त्यास दुसरा मुलुक देववू ;' हा आमचा करार आहे; ह्मणून बोलिले. त्याप्रमाणे सेवेसी विनंति लिहिली आहे. काय आज्ञा ते करावयास स्वामी समर्थ आहेत; येविसी त्यांहीहि सेवेसी विनंति लिहिली आहे. दुसरें बोलिले की गोवैरनदोर यांही आह्मास लिहून पाठविले आहे. साता रोजांनी खत आले. लिहिले आहे की मुरारराव घोरपडे यांहीं तीरचनापलीस आमचे फौजेबराबर राहोन बहुत ज्यांफीशानी केली. सुभानराव मुरारराव यांचा भाऊ कामास आला. याजकरितां तुह्मी रावसाहेबांस लेहून पाठवावें की मुरारराव आपले जाणोन यांजवर मेहेरबानी करावी, ह्मणोन लिहिले आहे; तर तुह्मी हे गोष्ट रावसाहेबांस लेहून मुरारराव याजवर नेकनजर धरीत तें करावें व आमचे गोवरनदोरास रावसाहेबांचे खत आणवावें की तुमचे लिहिलेप्रमाणे मुसाबुसी यांहीं मुरारराव यांविषयी आझांस सांगितले. आमी त्याजवर खुष आहों. येखलासांत तफावत होणार नाही. ऐसे पत्र आलियाने आमचे खावंद ६६ महमदअल्ली ह्या वेळी इंग्रजांच्या हातांत होता. त्याच्या स्वाधीन अर्काट व त्रिचनापल्ली हे दोन किल्ले मात्र होते. तेथे इंग्रजांचा वर्चष्मा होता तो अजीबात नाहोंसा व्हावा ह्या हेतूने पेशव्यांकडून महमदअल्लीस कौल देऊन आणवावें ह्मणजे इंग्रजांना ह्या दोन किल्यांत रहाण्याचे काही एक कारण रहाणार नाही अशी योजना बुसीने घाटिली होती. ६८ १३ जून १७५२ त क्लाइवनें त्रिचनापल्लीचा किल्ला घेतला. तोपर्यंत मुरारराव घोरपड़े महमदअल्ली व इंग्रज ह्यांच्या बाजूला होता. पुढे तो डुप्लेच्या विनवर्णावरून फ्रेंचाना मिळाला.