पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वाचे पाळीवर एकीकडे वीस तोफा गाडियावर मांडिल्या आहेत; दुसरेकडे वीस गाडे दारूचे संदुखाचे आहेत ; गरनाळाचे कितेक गोळे पडले आहेत; उभयतां सेवक व खान म॥रनिले चारमहालीस आलियावर खान म॥निले येही उभयतां सेवकांस पुढे करून आपण पाठीमागे राहोन पाश्चात चक्रामधोन माडीवर दर्शनास नेले. सेवकाबराबरील लोक अवधेच समागमें घेतले. कोणास मना केले नाही. माडीवर गेलो. वरती फिरंगीयांची मजालीस केली होती. खुरशा मखमालजरबाबी मढोन मांडिल्या होत्या. उभयतां सेवकांकरितां दोन खुरसिया नवाबाचे खुरसीनजीक ठेविल्या होत्या. पानवाब अंदर होते. सेवक खुरसीयांवर बैसलों. क्षणैकानें नवाब आले. सेवकास भेटले. सन्मान करून बैसविलें. सेवकाने एक मोहोर व पांच रुपये नजर दाखविली. ते कबूल केली. तदनंतरें उभयतां स्वामीची दुवा सांगोन पत्राची थैली होती ते रुजू केली. ते स्वहस्ते घेतली. त्याउपर सरकारांतून वस्त्रे दिल्ही. ती सनगें दहा. त्याजपैकी दुपटा रुमीखानास दिला. बाकी नव सनगें होती. ते खानामध्ये घालून रुजू केली. बहुत संतोष मानून मान्य केली. स्वमुरखें स्वामीचा कुशलार्थ पुशिला. घटिका एक बैसले होते. तदनंतर उठोन खलवतांत सेवक उभयतांस घेऊन गेले. बोलिले की रावसाहेबांजवळ आमचा दुसरा विचार नाही. आमी एकवचनी आहों. जो स्नेह संपादिला त्यांत दुसरा विचार नाही. प्रस्तुत मजकूर बोलावें तर तुह्मी श्रमाने आले आहां यास्तव तुझी आश्रमास जावें. उदैक परस्परें बोलणें तें बोलोन सैद लश्करखान व रावअजम यांचा सांप्रत स्नेह कसा आहे तो सांगावा. सेवक बोलिला की स्नेह राहणे तो खरेपणावर राहतो. दगाबाजीचे कर्तृत्वास स्नेह कळतच आहे. प्रस्तुत त्यांचे स्नेहाचा विचार असाच कांहीं आहे. सविस्तर विदित केला जाईल. या गोष्टीवरून संतोष पावोन सेवकास रुखसत केले. ते समयीं बोलिले की हिंदुस्थानचे राजेयांची आमास पत्रे आली आहेत. ऐसें बोलोन ६२ तत्कालीन वस्तुस्थितिदर्शक वर्तमानकाल. पा बुसी ६३ पाश्चात्यांच्या चालीप्रमाणे रचलेल्या सैन्याच्या चक्रव्यूहांतून.. ६४ ह्यावरून मुसाबुसीचा पत्रव्यवहार हिंदुस्थानांतील राजेरजवाड्यांशी होता असें