पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४१ पाठविलें. मागितले की वकील कोठे उतरले आहेत तो जागा पाहोन आजचा रोज त्यांस तेथेंच असों देणे. आजचे रोजांत जागा तयार होईल. उदैक रुमीखानास पाठवून त्यांस भेटीस आणवू ह्मणोन सांगोन पाठविलें. म॥निले आमास भेटले. बोलिले की तुमचे येण्याची प्रतीक्षा बहुत करीत होते. तुझी आले ऐकोन बहुत संतोष पावले. यांचा मनोभाव श्रीमंत स्वामींच्या ठायीं दृढतर आहे. आज तुही यथेच राहुटी देऊन राहावें. उदैक रुमीखानास घेऊन येतो. समारंभे भेटीस +नेऊन ऐसें बोलोन गेले. छ १२ रोजी भोमवारी प्रातःकाळी राहुटीमध्ये सेवकानें बिछाना टाकून सिद्धता केली. विडे, पान वगैरे साहित्य आणिलें. प्रातःकाळचा घटिका सासात दिवस आला तों दिनानाथपंत रुमीखानाकडे आले. रुमीखानाची स्वारी तयार जालियावर पंत म॥निले सेवकाजवळ आले. बोलिले की रुमीखान भेटीस येतात त्यांस वस्त्रे दिली पाहिजेत. बोलिलों की खान म॥निलेच्या वस्त्रांविषयीं हुजूर विनंति केली होती, परंतु सिरिस्ता नाहीं हाणोन दिली नाहीत. प्रस्तुत प्रसंग संपादिला पाहिजे. तर नवाबास दहा वस्त्रे दिधली आहेत. त्यांजमध्ये लाल दुपटा सवाएकसष्टांचे आंखचा आहे तो द्यावा. ऐसा करार करोन दुपटा काढून ठेविला. इतकेयांत रुमीखानाची स्वारी आली. पालखीत बसोन आले., बराबर दोन तीन कसेबरखंदाज, गाडदी व निशाण व वायें ऐसे समारंभाने आले. भेट जाली. बहुत संतोष पावले. समाधानाच्या गोष्टी केल्या. स्वामीच्या प्रतापाचें स्तोत्र बहुत केले. रामदासपंताचे दुराचरण आठविलें. नवाबगजफरजंग यांचा स्वामीच्या ठायीं निखालस स्नेह तेंहि वृत्त सांगितले. तदनंतर त्यांस दुपटा पांघरविला. विडे, पान देऊन त्यांजबराबर सेवक व दिनानाथपंत ऐसे निघाले. खान मनिलेने अवघे आपले लोक उभयतां सेवकांचे घोडेयांपुढे लावून आपली पालखी घोडेयांमागे चालविली. याप्रमाणे समारंभाने भेटीस आणिलें. नवाबानेंहि चारमहालीमध्ये समारंभ केला. तमाम गाडदी फरंगी कमरबस्ता करून दुतर्फा उभे केले होते. चारमहालीचे तला ६१ रामदासपंत १७५२ च्या एप्रिलांत मारला गेला. । नेऊ.'