पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कारवानासमीप येतां तेथें चौकीवर नवाबगंजफरजंग मुसाबुसी यांचा हरकारा सेवकाचा मार्ग लक्षीत बैसला होता. त्याची भट होतांच बोलिला की तुमचेच खबरकरितां मजला येथे बसविले आहे, नवाब तुमची वाट पहात आहेत, एसें बोलोन जलदीने खबर पोचवावयास गेला. सेवक कारवाना सिरे यास यऊन मुचकुंदा नदीचे पुलासमीप गोसावी यांचा मठ होता. रम्य स्थल पाहोन स्नानसंध्येस उतरलों. दोघे लढाईत व दोघे जासूद नवाबाकडे पाठविले. मागितले की आमची सलाम सांगावी आण आमात रहावयास जागा शहरामध्ये मागोन जागा करार करतील तो पाहोन येणे. येथोन निघोन शहरांत जाऊन लढाईत जासूद नवाबाकडे गेले. नवाब चारमहालीमध्ये राहिले आहेत. खबर पोंचतांच बहुत संतोष मानून तोफा मारविल्या. लढाईत जासुदास पांच रुपये इनाम दिधला. सेवकास रहावयास जागा तयार करविला. राजश्री दीनानाथ गोविंद यास बोलावून आणून सेवकाकडे सोळा त्या पत्रांत रघुनाथराव थालनेरास असल्याचे लिहिले आहे. १७५३ च्या एप्रिलांत अमदाबाद सर करून हिंदुस्थानांत जाण्यास रघुनाथराव थालनेरास आले होते. तेव्हा १७५३ हा सन त्या पत्राचा खास होय. या पत्रांत ११ जिलकादी सोमवार, १२ जिलकार्दी मंगळवार, १३ जिलकादी बुधवार, १४ जिलकादी गुरुवार दिला आहे. व हे वार व तारीखा बरोबर आहेत. मोडकांच्या जंत्रीत ११ जिलकादी रविवार दिला आहे. त्याचा अर्थ खाली दिल्याप्रमाणे समजावयाचा. मुसलमानी दिवस अस्तमानी सुरू होतो झणजे हिंदूच्या रविवारी अस्तमानी ११ तारीख सुरू होते व हिंदूंच्या सोमवारी दुपारी ११ तारीख असून सूर्यास्ताला संपते. ह्मणजे मोडकांची जंत्री वाचतांना मुसलमानी पत्रांतील तारखा व दिवस बरोबर आहेत किंवा नाहीत ह्याचा पडताळा पाहावयाचा असल्यास, दिवसा घडलेल्या गोष्टीचा संबंध येईल तेव्हां मोडकांच्या जंत्रींतील तारखेच्या पुढील वारचा दिवस तारखेचा घ्यावा व रात्री घडलेल्या गोष्टीचा संबंध असेल तेव्हां तारखेच्या समोरीलच वाराची रात्र घ्यावी. ६० नवाब गजफरजंग हा किताब मुसाबुसीला औरंगाबादेच्या दरबारांत मिळाला होता. सध्याच्या इजिप्तांत कांही इंग्रजांना पाशा, सरदार वगैरेकिताब मिळविण्याची हौस वाटत असलेली आपण पहातों त्याप्रमाणेच गेल्या शतकांत फ्रेंच लोकांना निजामच्या दरबारांत मुसलमानी पदव्या मिळविण्याची मोठी फुशारकी वाटे. इजिप्तांत मुसुलमानी पदव्या प्रथम नेपोलियनच्या वेळी फ्रेंच लोकांनी घेतल्या. त्यांचेच अनुकरण इंग्रजांनी प्रस्तुत काली के भाहे.