पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बरते निंबदेव्हारेयाचे रुखें मौजे राजेवाडीवर मुकामास भाले झणोन जासूद सांगत होते. विनंतिपत्र लिहीत असतां दर्याजी जासूद खानाचे जासुदाकडे पाठविला होता. त्याने येऊन वर्तमान सांगितले की खानाचे बातमीचे जासूद स्वामीचे लष्करांतून आतांच आले ते सांगत होते की स्वामीचा मुकाम खेडानजीक वडगांवावर आहे. बराबर फौज वीसेक हजार आहे. हे वर्तमान आतांच कळलें तें सेवेसी विदित व्हावयाकरितां विनंति लिहिली आहे. नवाबाने खानास आघाडी सांगितली. परंतु अद्याप आघाडीस गेले नाहींत. पिछाडीसच राहत असतात. खान आज जरीदा जाले. बहुतेक वस्तभाव माघारी लाविली.. तुरकाबादेस ठेवावयास सांगितली आहे. नवावाबराबर फौज पंचवीस हजार पावेतों जमा जाली आहे. आढळलें वर्तमान सेवेसी विनंति लिहिली आहे. सेवेसी श्रुत जालें पाहिजे हे विज्ञापना. या मुकामाहून वामोरी खालती तीन कोश आहे. विदित जाले पाहिजे. राजश्री शामजी गोविंद शहरांतून काल लष्करांत आले हे विज्ञापना. राजेश्री मनोहरपंती आज प्रात:काळी विनंतिपत्र लेहून दिले. सेवक मजलीस आलियावर विनंतिपत्र लिहिले आहे. सेवेसी श्रुत जाले पाहिजे हे विज्ञापनों. [१४] ॥ श्री॥ १३ सप्टेंबर १७५३. पुरवणी श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी: कृतानेक विज्ञापना. छ ११ माहे जिलकाद सोमवारी नासरजंगपेठेहून निघोन शहर दाखल व्हावयास आलों. गोलकुंडा किल्ला पाठीमागे टाकून ५७ मुकामास ५८ १७५१ तील ह्या लढाई संबंधी आमचे जवळील पत्रे येथे संपली. ५९ हे पत्र १७५३ च्या सप्टंबरांत लिहिलेले आहे. कारण याच्याच जोडीच्या लेखांक