पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काळापूर्वी महमशनवरखान नवाबाने देवविला आहे. याजप्रमाणे लष्करांत वांटणी केली व करीत गत आहेत. हणवंतराव निंबाळकर काल छ ४ रोजी लष्करदाखल जाले. दा दोन हजार राऊत बराबर आले आहेत. काल संध्याकाळापूर्वी महमदअनवर पुढे पाठविलेयावर रावमशारनिल्हे नवाबाचे मुलाजमतीस - आले. सेवेसी विदित जाले पाहिजे. सुभानजी थोरातहि दोन कोस स्वारांनी पांढरेहि आले. सासात कोस स्वार आहेत. आघाडीस रा। राहिले आहेत. हणवंतराव निंबाळकर यांची फौज खुदावंदखान खजाना घेऊन बराबर आली. हाली खासा दोन हजार फौजेनसी आले. येकूण १, फौज आहे. नवाबाची फौज जमावत चालली. आजत।। वीसक, जमा जाली आहे. आणीकहि जमा होतच आहे. आणीक, दळले की राजाजीने महाराव यांस पत्र पाठविले की तुझी फामा सटवाजी जाधवराव यांस निरोप देणे व स्वामीसहि पत्र पाठविल न्हावें; व खानास हरकारेयानें खबर दिली की महाराव जाधवराव घेऊन लष्करांत येत आहेत. ही गोष्ट खानच बोलत होते. स्वामीजवळ फौज जमा जाली नाही. चार पाचेक हजार स्वार आहेत. स्वामाचा मुकाम पुण्यासमीप कळसावर आहे ह्मणान येथे बातमी आहे. खानाह याचप्रमाणे बोलत होते. सेवकानें जाधवराव यांजकडे पत्र लेहून जासूदजोडी काल पाठविली त अद्यापवर आली नाही. आज संध्याकाळपावेता आली तर येईल. विनंतिपत्र लिहीत असतांच जाधवराव यांकडे जोडी पाठविली होती ते आतांच आली. जाधवराव यांनी सेवकास पत्र पाठविले. तेथ लिहिले आहे की तुह्मी वर्तमान लिहिले ते कळलें; स्नेहाचे विचार त्यांनी आसास बोलाविलें त्यावरून आलों; आह्मी जवळच आहों; भेटीचे विचार कडून जाल्यास होईल; न होय तर उत्तम; येथील बातमी मात्र वरचेवरी अंतस्थाची खबर आझांस व श्रीमंताकडे रोजच्या रोज लेहून पाठवीत जाणे, ह्मणोन छ ४ मोहरमचे पत्र आले. जाधवराव व महाराव एकत्र आहेत. सिंगपिंपळगावास उभयता होते. तेथून कालच कुच करून सातआठ कोश