पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्याचा जाबसाल करून देतों ह्मणोन राजाजी बोलत आहेत. सेवक खानाजवळ या गोष्टीकरितां नित्य बाजीद आहेच. आजहि बाळाजीपंताचे कारकून खजानेयांत पैका द्यावयास गेले आहेत. दहा वीस हजार आज पदरी पडितील ह्मणोन बोलत होते. खजानेयांत ऐवज नाही. मेळवामेळव करितात. हैदराबादेचे खजानेयाची वाट पाहत आहेत. हा ऐवज आठा चहूं रोजांत देतील ह्मणून बाळाजीपंत बोलत होते. हे विज्ञापना. - ॥श्री॥ १३ नोवेंबर १७५१. पंतप्रधान श्रीमत्त राजश्री स्वामीचे सेवेसी: विनंति सेवक रघुनाथ गणेश कृतानेक विज्ञापना. स्वामीचे कृपादृष्टीने सेवकाचें वर्तमान तागायत छ ५ मोहरम पावेतों मे॥ लष्कर नवाब सलावतजंग यथास्थित असे. छ म॥री मौजे कुंपटीहून लष्कराचा कुच जाला सानवाकोशाचा. मौजे केदल व पाबल मुलखडीचे तीरी मुक्काम जाला. दरकुच अहंमदनगराम जातात. तेथें जनाना ठेवून व बहुतेक बाहेर ठेवून जरीदा होहून पुण्यास येणार. खानअजम सैदलस्करखान यांचे डेरे दोन होते. पैकी आजच येक माघारा पाठविला. कायगांवीं अगर पुढे दरयेक गांवीं ठेवावयास सांगितला आहे. राजाजीनें खानास येक लक्ष रुपये पेशगी आज प्रातःकाळी पाठविली. आज्ञा केली की स्वारास एकेक महिना पेशगी बिलाकसूर देणे. दोन महिनेयांची तलब राहिली तो ऐवज खजानेयावर ५६ हे पत्र लिहिल्यापासून नवव्यादिवशी २२ नोव्हेंबरास पेशव्यांची व निजामाची कुकडीनदीवर प्रहणाच्या दिवशीं गांठ पडली. पेशवे कळस, खेड व वडगांव या गांवांवरून कुकडीवर गेले व निजाम कुपटी, केदल, पाबळ, व नगरावरून कुकडीवर आले.