पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१२] ॥श्री॥ १४ अक्टोबर १७५१. पुरवणी श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सवेसी:कृतानेक विज्ञापना. खजाना येथे दोन लक्ष अठावन हजार रुपये पोतापैकी देववून मग नवाब रोजेयांस गेले. त्यापैकी दहा हजार रुपये मात्र राजश्री बाळाजी महादेव यांहीं मोजून घेतले. अरकाटी, गंजीकोटी रुपये देतात. तदनंतर खजानेयाचा दरोगा रोजेयांस गेला होता तो अद्याप आलाच नाही. खजाना द्यावयाची घालमेल दिसते. परंतु देतील. ब-हाणपुरी पावणेतीनलाख रुपये देवविले ते हरबाजीराम वकील याचे मारीफत बाळाजीपंताचे कारकून व खजानची याचे पदरी पडिले. तेथून हरबाजीरामाने अहमद मीरखानाचें दस्तक घेऊन बदरका मागोन खजाना रवाना करावा ते त्यांच्याने न जालें. नवाबाचे दस्तक पाठवाल ह्मणोन त्यांणी बाळाजीपंतास लिहिले. येथें खानास वर्तमान विदित करितांच खानांनी राजाजीस सांगोन दस्तक व अहमद मीरखानास बदरकेयाबाबे पत्र ऐसी राजाजाची घेतली. राजाजीने आपले मोहरेनसीं दस्तक व अहमद मीरखास पत्र दिले. ही पत्रे नबाब रोजेयांस गेले होते तेथें राजाजी व खान गेले होते तेथे घेतली. छ ४ तेरीखेस बाळाजीपंती आपले पंचवीसेक राऊत व पन्नास प्यादे देऊन दोन कागद बहाणपुरास पाठविले आहेत. या उपरी खजाना येईल. राजश्री मानाजी निकम यास बदरकेयास स्वार पाठवावयाकरितां बाळाजीपंती लिहिले होते व सेवकाजवळोन लेहविले होते. त्याचा जाब काल आला, मशारनिल्हेचे कारकुनाचा. त्यांत लिहिले आहे की आह्माजवळ राऊत नाहीत. याच प्रकारचे वर्तमान आहे. मशारनिलेचे राऊत व प्यादे गेले आहेत. स्वामीचा पुण्यप्रताप समर्थ आहे. खजाना येईल व कितेक जिन्नस सुटीत गेला त्याची यादबस्त खानाचे मारिफत राजाजीजवळ गेली आहे. ५५ पुढे खजीना न येऊन लवकरच लढाई सुरू झाली.