पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सस्य मिथ्य कळत नाही. गायकवाडाचे भौवांनी सोनगडाकडे फौज जमविली आहे. दहा वीस हजार जमा झाला आहे. नवाचास सामील होणार. त्यांचा भरोसा राजाजीस बहुत आहे ह्मणोनहि येथे लोक बोलतात. मागे सेवेसी विनंति पत्रीं लि॥ होती की नळदुर्गवाल्याचा कासीद दिल्लीस गाज़दीखानाकडे जात होता तो ब-हाणपुरी सांपडला. येथे आणून गाढवावर बैसवन सोडिला. ऐशास वर्तमान मनास आणितां तो कासीद चित्रदुर्गवाल्याचा होता. पांच मोहरा नजर व पत्र घेऊन जात होता. चौघेजण होते. त्यांत तिघे पळाले. त्यांत एक सांपडला. त्याची गत येथे सदरहू प्रे॥ जाली. सेवेसी विदित व्हावयाकरितां विनंति लिहिली आहे. येथे शहरांत सजगूरजोंधळे दर रुपयास तीस शेर मिळतात. हरभरे पंधरा शेर, गहू १६ शेर, तूप भाद्रपदात रुपयाचे निम शेर होते. मग पाऊण शेर जालें. मग शेरभर, मग सवा शेर, आतां दीड शेर आहे. तेल चार शेर आहे. दूध नवदहा शेर. लांकडे रुपयाची एक मण. चारा फार महर्ग झाला आहे. एका जनावरास पावल्याची वैरण पुरत नाही. यापे॥ वर्तमान आहे. राजश्री शामजीपंत सांगत होते की राजाजीचे चित्तांत बिगाड करणे हा निश्चय जाला आहे. खान मध्ये परिमार्जन करितात यास्तव यांस हरएक मसलहत कळों न देतां कलह आरंभावा. निमित्य की पेशवे नित्य दबावितात. आज समय आहे. या समयीं अनमान केलियास पुढे पेशवे यांच्या फौजा जमा जालियावर आह्मास सोडितात हे होत नाही. यास्तव कलह करावा. मग होणे ते होऊदे. हा निश्चय झाला आहे. शाहनवाजखान व राजाजीचें एक मत आहे. शहानवाजखानाकडील एका मातबर गृहस्थाने सांगितले झणोन बोलत होते. ते सेवेसी विनंति ल्याहावी लागली. सेवेसी श्रुत जाले पाहिजे. स्वामी धणी समर्थ आहेत. हे विज्ञापना.. ५३ केदारजी इत्यादिकांनी. बाजरी, जोंधळे. ५४ राजाजीस सल्ला मुसाबुसीकडून मिळे. अर्थात् राजाजीचे बेत प्रणजे मुसायुसीचेच बेत होत. बुसीच्याच सल्यावरून मराठ्यांच्या हहींत लढाई नेण्याचा पार निजामाने याता.