पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राजाजीस सांगोन सोडवितों. भाज उद्यांत कासीद सोडवून घेतो. येथे राजाजीने शहरचे गर्दनवाईस मोठी खबरदारी मांडिली आहे. चौकीदारांस ताकीद जाली आहे की कोणाचा जासूद येईल अगर शहरांतून नाईल त्यास रुजू करावें यास्तव लोकांस कागदपत्र पाठवावयाचा संशय निर्माण जाला आहे. कालच सरकारची जोडी खासदस्तुराच्या पुरवण्यांची आज्ञापत्रे घेऊन आली. त्या जासुदांनी झोळणे बाहेर ठेऊन सडे होऊन चौकीवरून निभाऊन शहरांत आले. त्यास वाजपूस चौकी. दारांनी केली. खाली पाहिले ह्मणान सोडिलें. ऐसा प्रसंग येथे जाला आहे. पाजकरितां हुजरून जोडी रवाना होईल तिणे सातारेयास यावें. नेथे झोळणे ठेऊन खाली होऊन पत्र येथे पोचवावें. ऐसी आज्ञा जासुदास जाली पाहिजे. येथूनहि याच रीतीने विनंतिपत्रांची रवानगी करीत जाऊं. सेवेसी श्रुत जाले पाहिजे. येथे एक पडेगोसावी बेगमीबेगमपुरियांत आहे. खानाफडे जातां वाटेवर आढळतो. त्याणे अकस्मात् एक दिवस सेवकास सांगितले की तुह्मी पेशवे यांचे वकील आहां. आह्मीं स्वप्न पाहिले की बारीमतीवाला कोणी आहे तो घालमेलींत आहे. तर हे वर्तमान तुह्मी जरूर आमचें नांव घालून श्रीमंतास लेहून पाठवणे. त्याजवरून सेवेसी विनंति लिहिली आहे. राजश्री बाबूजी नाईकांकडील वकील कृष्णाजी रघुनाथ राजाजीकडे जात येत असतां कांहीं उत्तेजन देतात ह्मणूनहि येथे लोक बोलतात. सारांश येथे वळवेळ करीत आहते. सप्तरुषीवरील मातुश्रीचहि येथे कागदपत्र येतात. जाबसाल जात असतात. लक्ष्मण खंडागळा नवाबकडील याचा व रघूजी भोसल्याचा हर्षामर्ष जाला ह्मणोन येथे गप उठली आहे. ४८ बाबूजी नाईक बारामतीकर. ४९ क्षुद्र किड्यांसारखी. ५० सातारा. ५१ येथे ताराबाईची नाजूक थट्टा केली आहे. डोंगरांवरून जशा, सोनजाई, वनजाई, इत्यादि आया असतात तशी सप्तरुषी ह्मणजे सातारच्या किल्यावरील आई ह्मणजे ताराबाई. ताराबाई ह्या वेळी वृद्ध झाली असून साताऱ्या मांजराप्रमाणे फार खुनशी झाली होती. तेव्हां लोक तिला रानच्या देवीची उपमा देत. ५२ तंटा, लढाई.