पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ऐवज नाही. खुदावंदखान हैदराबादेहून चाळीस लक्ष रुपये खजाना घेऊन येत आहेत. ते आलियावर सिबंदी देतील. येथूनहि काही लोक खुदावंदखानास आणावयास रवाना होत आहेत. येथें आज दोन तीन दिवस हुल्लड झाली आहे की श्रीमंती यशवंतराव पवार दहा हजार फौज जरीदा करून खुदावंदखानावर पाठविले आहेत. खजाना अटकावून आणावा हे वार्ता येथे दाट राजाजी पावेतों आहे. या वर्तमानावरून कितेकांचा आव गेला आहे. जर हे गोष्ट सत्य असली, खजाना सरकारांत हस्तगत जाला, तर हे सहजच गर्वहत होत आहेत. व येथे लोक ह्मणतात की दोन महिने श्रीमंती असेंच यांस दबकाऊन राखिालेयास हे मापलेयांत आपण मरतात. यांस मारावें लागतच नाही. लौकर दारमदार जाला तर यांची स्थिती राहेल झणोन सर्वत्र ह्मणतात. यांस सिबंदी व खानगी खर्च मिळोन नित्य लक्ष रुपये खर्च माहे. दरमहा तीस लक्ष रुपये पाहिजेत. खजान्यांत तो पैका नाही. हैदरोबादचा खनाना आणविला आहे. द्यावा तर तोहि आला तरी तितक्याने बेगमी होत नाही ह्मणोन लोक झणतात. यास्तव या दिवसांत यांस प्रता. पाचे दर्शन जालियाने याचा गर्व हत होईल. स्वामींचा पुण्यप्रताप यांजवर गालिब आहेच. काल छ ४ रोजी सलाबतजंग व राजाजी ऐसे अबदुलखैरखानाकडे गेले होते. डेरे बाहेर करावयाचे विचारांत आहेत. नवाबाचे बहिणीचें लम आहे व नवाबहि आपलें लम करणार. ही कार्ये करून घ्यावीं; ईद करावी; पश्चात् निघावें सणोन घालमेल आहे. काय करितील पाहावें. रिक्तपाणी पडिले आहेत. उगाच आव मात्र धरितात. प्रसंगास गंधर्वनगरामास दिसतो. याजकरितां यांजवर या दिवसांत सलाबत गालीब जालियाने यांची गुर्मी राहणार नाहीं ऐसें आहे. स्वामी समर्थ आहेत. सरकारच्या कासीद जोडिया दोन येथे राजाजीने अटकावून ठेविल्या भाहेत. हे वर्तमान सेवकानें खानास हटकिलेयावर बोलिले की माझास विदित नाही. याउपर ४७ गंधर्वनगराप्रमाणे अवास्तव.