पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[११] ॥ श्री ॥ १४ आक्टोबर १७५१. पंतप्रधान श्रीमंत राजेश्री स्वामीचे सेवेसीः विनंति सेवक रघुनाथ गणेश चरणावरी मस्तक ठेवून स॥ नमस्कार कृतानेक विज्ञापना. स्वामीच कृपादृष्टीने सेवकाचें वर्तमान त। छ ५ माहे जिल्हेन पावेतों मे॥ शहर औरंगाबादेस यथास्थित असे. स्वामीचे आज्ञापत्र खासदस्तुरच्या पुरवण्या दोन-एक राजश्री शामजी गोविंद यांचे नांवची व एक सेवकाचे नांवची-छ २९ जिलकादच्या सादर त्या छ ३ जिल्हेजी चतुर्थ प्रहरी प्रविष्ट जाल्या. लखोटा फोडून शामजीपंताची पुरवणी त्यांस दिली. सेवकाने आपले नांवची पुरवणी अक्षरशा वाचून मनन करून कृता. र्थता मानिली. आज्ञेप्रमाणे कोणाजवळ कांहीं बोलत नाहीं. खानाजवळ नित्य जाऊन आज्ञेप्रे॥ स्नेहभाषणच करितो. व जें वर्तमान आढळतें तें विनंतिपत्रीं लेहून पाठवितों. स्वामीचे आज्ञेविरहित अणुप्रमाण कार्य करीत नाही. पूर्वील खासदस्तराचे परवणियांचा अर्थ शामजीपंतांचे विचार विदित करावयाचा जाला तो म॥रनिलेहींच खानांस व राजाजास निव. दिला. सेवक सन्निध मात्र होतो. मरनिलेने आपले व सेवकांचे आज्ञापत्रांचा अर्थ एकत्र करून निवेदिला. सेवकांचे आज्ञापत्री आज्ञाच होती की हे पत्र वाचून दाखवणे. सेवकास स्वामीचे आज्ञविना दुसर कर्तव्य नाही. सवक अज्ञान आहे. स्वामी कृपादृष्टीने पालन करून परवर्दा करीत आहेत. वरकड येथील वर्तमान तर नवाब रोजेयांस छ १ जिल्हजी गेले ते छ ३ मिनहूस रात्रौ शहरदाखल जाले. आतां बाहेर डेरे करावयाची बोली आहे. जागा जागा तयारी होत आहे. कोणी ह्मणतात की उदैक सावे तेरिखेस पेशखाना बाहेर निघणार. कोण्ही ईद जालियावर ह्मणतात. या प्रकारचे येथील वर्तमान. परंतु येथे सिबंदीचा गवगवा बहुत जाला भाहे. सिबंदी दिलियाविरहित फौज बाहेर पडत नाही. सिबंदी द्यावयास येथे