पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जाचसाल करावयाचा तो करून पंधरा रोजांचा वाइदा केला आहे. हे वर्तमान सेवकास विदित जाले त्याजवरून सेवेसी विनंति लिहिली आहे. चिंतामण केशव यांनीहि विसी विनांत लिहिलीच असेल. पाजी लोकांचा विचार आहे. त्यांची तनखा राहिली असली तर देववणार खामी धनी आहेत. हे नाजूक गोष्ट येथे बाभाट जालियास अब्रमी गाठ पडेल. खामीधनी समर्थ आहेत. सवेसी श्रुत व्हावयाकरितां विनंति लिहिली आहे. नासरकुलीखान याची अप्रतिष्ठा राजाजीने केली, हे वर्तमान पूर्वील विनंतिपत्री सेवेसी विनंति लिहून पाठविली आहे, त्याजवरून विदित झाले असेल. अलीकडे शोध मनास आणितां निजामअली नवाबाचे बंधु हे राजे रघुनाथदास यांजवर रुष्ट आहेत. त्यांनी राजेयांस मारावयाचा प्रयोग करून महजर केला. त्याजवर मातबराच्या मोहरा घेत चालिले. या प्रयोगास पांच सातजण मिळोन मोहरा केल्या. त्यामध्ये नासरकलीखानानें मोहर केली होती. पुढे ही गोष्ट प्रकट होऊन राजेयांस विदित जाली. त्याजवरून निजामअली यांस निग्रह केला व नासरकुलीखानास बेवकर केलें. वरकडांचे तलासांत राजे आहेत. हे वर्तमान एका मातबर कायताने सांगितले. तें सेवेसी विदित व्हावयाकरितां विनंति लिहिली आहे. येथे शोध घेतां राजाजीवर अबवे रुष्ट आहेत. कोण प्रसंगी काय होईल कळत नाही. राजाजीस मोठा भरवसा फरंगीयाचा आहे. सेवेसी विदित जालं पाहिजे हे विज्ञापना. नवाब आज बुधवारी प्रतिपदेस रोजेयास जाणार होते, परंतु आज राहिले. उदेक जाणार आहेत. सेवेसी विदित व्हावयाकरितां विनंति लिहिली आहे. हे विज्ञापना. RENERAI বাসক ৭ * ४६९ अक्टोबर १७५१