पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होळकर याजकडे जात होती ते येथे शहाचे चौकीवर आढळली. त जोडी वक व मल्हारबा कडून कासीद जोडी हुजूर जात होती तेहि येथे चौकीस आढळली. येकूण दोन्ही कासीद जोडिया राजे रघुनाथदास यांहीं अटकवन बैसविल्या आहेत, ह्मणोन सरकारचे जासूद दरबारचे बातमीवर असतात त्यांनी सांगितले. जासूद बोलिले की हे वर्तमान मनोहरपंतास विदित केलें. मनोहरपंत बोलिले की दरबारास गेलियावर मनास आणूं. सेवेसी विदित जाले पाहिजे. हे विज्ञापना. [१०] ९ अक्टोबर १७५१. पु॥ श्रीमंत राजश्री स्वामीचे सेवेसी:-- पंतप्रधान कृतानक विज्ञापना. नळदुर्गवाले यांचा कासीद दिल्लीस गाजुदीखानाकडे कागद व पाच मोहरा नजर व कांहीं वस्त्रे घेऊन जात होता तो नन्हाणप.. रास आढळला. तेथून येथे पाठविला. त्याचा शिरच्छेद करावयाची आज्ञा राजाजान कली. नवाब बोलिले की इतका त्याचा अपराध नाही. शिरोली न करावा. मग त्यास गाढवावर बैसवन विपत्य करून सोडिला. नळदुर्गवाले पापा कासाद ह्मणन लोक ह्मणतात. सत्य मिथ्या काही कळत नाही आढळलं वर्तमान सेवेसी विनंति लिहिली आहे. राजश्री शिवराम गोविंद भिडे यांचे मारिफत कांहीं बाणदार सरकारांत चाकर आहेत. त्यांजपैकी पागजण बाणदार तनखा न पावली ह्मणोन निघोन आले. ते येथे राजे नाथदास यांजकडे नोकर जाले. ते चौघेजण आपले बराबर दुसरे वीस पचवास बाणदार घेऊन शिवराम नाइकाचे दकानी जाऊन म॥रनिले गुमास्ते चिंतामण केशव यांजपाशी तनखेकरितां बहुत हंगामा केला. त्यांनी