पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होते. खान मशारनिले दवद्धि सांगोन गेलियावर मागें नसीरजंग व राजाजी बैसोन महसलत करितां, नसीरजगांनी बहुत प्रकारे परिमार्जन केलें की हे गोष्ट उनमांत दिसत नाही. मागं थोरले नवौंबानें बहुत यत्न केला होता तो व्यर्थ जाला ह्मणून सख्य संपादून होते. आतां तुह्मी विरुद्ध करूं मणतां ; ऐशास तुमच्याने गनीमाई मोडवत नाही व गनीमाच्या हि तुह्मांस मोडवत नाही. नाहक लौकिक करून घ्यावा. सीबंदी खालें यावे. मुलुकाचा पाटावरवंटा होईल. बरा दिमत नाहीं. ऐसें बहुन प्रकारे परिमार्जन केले. हे वर्तमान दरचार शहरांत आवई फुटली. पांचासाता ठायीं आईकिलें. खरें खोरे कळत नाही. बहुतां मुखीं आईकिलें ह्मणून सेवेसी विनंति लिहिली आहे. अबदुल खैर खानाजवळ पांच हजार फौज आहे. न्यामध्ये काही लोक राजश्री हरी दामोदर य जकडील आहेत व कांहीं मानाजी निकमाकडील आहेत. राऊत चांगले नाहीत. बारगीर भरतीचा आह ह्मणोन लोक बोलतात. संवेसी विदित व्हावयाकरितां विनंति लिहिली असे. अवदल खैरखानहि व्यथेत आहेत; आरोग्य नाही. समप्ति होतील ह्मणोन लोक बोलतात. सेवेसी विदित जालें पाहिजे. हे विज्ञापना. सरकारची कौसीद जोडी हुजरून राजश्री मल्हारजी ४३ निजामुल्मुल्कानें. ४४ हा शब्द संन्यासी, साधु, संत यांच्या मृत्यूला लाविण्याचा प्रघात आहे. परंतु तो येथे द्वेषजन्य थट्टेनें खैरखानाला लाविला आहे. ४५ पुण्याहून उत्तर हिंदुस्थानांत जातांना कासीद औरंगाबादेवरून जात. पुणे, नगर, कायगाव, औरंगाबाद, अजंटा, ब-हाणपूर, हांडिया, सीहूर, सिरोंज आणि झांशी; हा हिंदुस्थानांत जाण्यास अगदी जवळचा रस्ता होय. मराठ्यांची राजधानी पुणे. तेव्हां पुण्याहून झोसांस जाण्यास कायगावटोक्यावरून व अजंट्याच्या घाटांतूनच रस्ता जवळ असे. पु. ण्याच्या पश्चिमेस इंग्रजांची राजधानी मुंबई आहे. तेव्हां, कासारघाटाने नाशीक, मनमाड, धुळे, हा रस्ता घेऊन मग ब-हाणपुराला इंग्रजी रस्ता मिळतो. भाऊसाहेब पानिपताला उदगिरीडून अजंट्याच्या घाटांतून हांडियावरूनच गेले. महाराष्ट्रांतून हिंदुस्थानास जाण्यास एकंदर तीन मार्ग आहेत. एक कोंकण गुजराथेंतून अमदावादेवरून रजपुतन्यांत जातो. दुसरा घाटमाथा व वेरुळचे डोंगर ह्यांच्यामधून मालेगावावरून, सेंध-याच्या घाटांतून महेधर, इंदूर, उज्जैन इत्यादि शहरांवरून रजपुतान्यांत जातो. तिसरा पुणे, औरंगाबाद, अजटा व हांडियानरून हिंदुस्थानांत जातो.