पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व पंचवीस करोल आहेत. खान म॥निले डरदाखल जालियावर रा रघुनाथदास भेटीस गेले होते. अबदुलखैरखानांहीं दोन घोडे निळे व दह खोन पारचे राजाजीस नजर केली. पैकी एक घोडा व पांच खोन पारचे घेतले महमद अनवरखानांनी दोन घोडे व कांहीं वस्त्रे नजर दाखविली. त्याज प॥ एक घोडा व वस्त्रे घेतली. तदनंतर राजे शहरांत आपले हवेलीस आहे खान म॥रनिलेची फौज बाळाजी महादेव यांनी पाहिली. ते फौजेचा म। बाळाजी महादेव येथे सांगत होते की तिसा रुपयांचे किंमतीपासून पांच रुपयांचे किमतीपावेतों घोडी आहेत. बहुतकरून खोगीरभीच फा आहे. सेवेसी विदित व्हावयाकरितां विनंति लिहिली आहे. काल संध्या काळी छ २३ मिनहूस खानाकडे गेलो होतो. तेथें खानाजवळ मोगली आले होते. त्याजमध्ये एक मोगल अबदुलखैरखानास भेटोन आला. तो खानाजवळ पारसी भाषेत बोलत होता की खान म॥रनिले बहुत मुमूर्षु आहेत. आह्मी भेटावयास गेलो तेव्हां निद्रिस्त होते. आही गेलियावर उठोन बैसले नेत्र पीतवर्ण जाले आहेत. तबीयत बहाल नाही. दोन तीन दिवस तबियत बहाल होतपर्यंत नवाबाची मुलाजमत करीत नाही. समाधान जा लियावर नवाबाची मुलाजमत करतील ह्मणोन बोलत होता. सेवेसा विदित व्हावयाकरितां विनंति लिहिली आहे. राजश्री मोरोपंत महायात्रेस परवांचे दिवशी येथून रवाना जाले. संन्यास द्यावयाचा विचार होता. परंतु राहिला. सेवेसी विदित जाले पाहिजे. नासरकुलीखान मोगल मातबर पथ आह त्याणे कमाणगराचे चौधरी यांस कांहीं चीज विकावयास दिली हाता रुपये न पावले झणोन त्याचे घरास चौकी पाठविली. चौधरी सांपई नाही ह्मणोन त्याचे बायकोस नेऊन कैद केले आण घरी चौकी बसविली हे वर्तमान राजेयांस विदित जालियावर राजाजीनें बकशीस आज्ञा करून नासरकुलीखान यास बेअब्रू करून पादचारी नेला. पालखीत बैसा दिला नाही. नेऊन फजित करून सोडिला. नेते समयी दोन चार माणसे जखमी ३४ वस्त्रे.