पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पत्रछ १५ मिनहू ची खासदस्तुराची दोन-येक राजश्री शामजीपंत यांचे नांवाचें व येक सेवकाचे नांवाचें-सादर जाली, ती छ १९ मिनहूस दोनप्रहरां प्रविष्ट जाली. स्वामीचे आज्ञेचा अर्थ सविस्तर विदित जाला. स्वामीची आज्ञा की किंबहुना हे पत्र खानास दाखवणे. आज्ञेप्रमाणे शामजीपंत व सेवक ऐसे खानाकडे जाऊन दोहों आज्ञापत्रांचा अर्थ सविस्तर खानास अवगत केला. खान बोलिले की आह्मास समजाविलेंबाप्रमाणे तुह्मीं उभयतां जाऊन राजाजीस समजावणे. इतकें बोलोन नथमल वकील यांस समागमें देऊन राजाजीकडे पाठविलें. छ २२ मिनहूस तृतीय प्रहरी नथमल व आझी उभयतां सेवक ऐसे राजाजीस भेटलो. खलवत जालें. खलनतांत स्वामींचे आज्ञापत्राचा अर्थ सविस्तर राजाजीस निवेदन केला. पत्रे दाखविली नाही. राजाजी बोलिले की खजानेयाकरितां कलह प्राप्त जाला ह्मणोन श्रीमंत आज्ञा करितात; तर खजाना आझी द्यावा हे गोष्ट आह्मास योग्य नाहीच. अबदुले खैरखानाजवळोन बेज्या गोष्ट जाली. आहास गोष्ट कळतांच आही कोणे वजाने त्यांस ताकीद लेहून पाठविली आहे हे वर्तमान बाळाजीपंतास जाहीर असेल. या गोष्टीची लाज आह्मास जाली आहे. आम्ही न बोलतां खजाना देत आहों. तीन लाख रुपये तो ब-हाणपुरी देवविले. राहिले दोन लाख चौतीस हजार ते उदेक येथे देववितो. तोंडाने देतों ह्मणावे आण देऊ नये हे गोष्ट सहसा घडणार नाहीं पांच लक्षांचा विषय तो काय ? याजकरितां श्रीमंती संशय मानावा ऐसें नाहीं. श्रीमंत आज्ञा करितील तर सहज पांच लक्ष रुपये पाठऊं सकतो. तेथें खजाना न देऊ हे गोष्ट कसी घडेल ? या गोष्टीवरून कलह वाढावा ऐसें नाहीं. श्रीमंतांस अबरूची गरज आण आह्मास आपले अबरूची शरम आहे की नाही ? गोष्ट अनुचितच जाली आहे. श्रीमंती आज्ञा केली की दिल्लीहून ब्राहालीची सनद आलियावर आह्मी जागीर देऊ ऐसे आमचे वचन गुंतले आहे. तर हे गोष्ट यथार्थ व श्रीमंताचेंहि वचन आह्माजवळ गुंतले आहे की मोगलाई वं गनीमाई दोन नाहींत. एकच आहेत. हा आमचा करार, याजकरितां जे आहे तें श्रीमं