पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

॥श्री॥ ८ सपंबर १७५१. पु॥ श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी:- कृतानेक विज्ञापना. शहराबाहेर लश्कर कितीक उतरलें ह्मणोन पहावयास मुजरद जासूदनोडी पाठविली होती. त्यास जयसिंगाच्या तळेयावर रायचूर आदवानीवाला, आचार्या दि॥ राजे रघुनाथदास, त्याचे स्वार दोन हजार अजमासें आहे. व भावसिंगपुरेयांत फतेसिंग सिनरवाला दोनस्वारानसी आहे. व भानजी खताल दि॥ गायकवाड दोनशे राऊतांनी जसिंगपुरेयाबाहेर उतरला आहे. येकूण बाहेर शहराचे जमाव सदहूंप्रमाणे आहे. बाकी स्वार शहरांत जागा जागा आहे, त्याचा सुमार कळत नाही. व दिल्लीदरवाजाबाहेर गाडदी फिरंगी याचा प्यादा अडीच तीनेक हजार आहेत. त्यामध्ये प्यादा पंचमेळ, परदेसी, मराठे, मुसलमान वगैरे असे आहेत. नवाबाचे कारखाने अद्याप आले नाही. आणावयाची ताकीद जाली आहे. नवाब छ २७ सवालीं शनवारी सीकारास महमुदी बागांत गेले आहेत. समागमें खान वगैरे अमीर गेले आहेत. सेवेसीं श्रुत जाले पाहिजे. हे विज्ञापना. [७] ॥श्री॥ ४ अक्टोबर १७५१. श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी:विनंति सेवक रघुनाथ गणेश चरणावरी मस्तक ठेऊन स|नमस्कार. तानेक विज्ञापना. स्वामीचे कृपादृष्टीने सेवकाचे वर्तमान त॥ छ २४ माहे जिल्कादपावेतों मे॥ शहर औरंगाबादेस यथास्थित असे. स्वामीची आज्ञा