पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

याप्रमाणे बोलोन आजीच पत्रे त्यांजकडे रवाना केली. आह्मी राळ्या आसपास चार मुक्काम करून राहातो. भेटी होतील. चार गोष्टी बोलोन तहास आणावें. स्वामींनी पत्र गंगोबास लिहिलेच आहे. त्याचअन्वये दुसरी पत्रे गंगोबास व मल्हारबास ल्याहावीं की चिरंजीव पाठविले आहेत; इकडे दोन महिने राहून एकदा भेट घेऊन जावें. ह्मणोन याअन्वयेंकरून एकामागेंएक दोन चार पत्र ल्याहावी. त्याचप्रमाणे जायाप्पासहि ल्याहावी. मल्हारबा खामखा येतीलसें दिसते. परंतु जायाप्पाची मर्जी कळत नाही. स्वामींनी त्यास क्षेपनिक्षेप ल्याहावें. ह्मणजे उभयतांसहि घेऊन येऊ. जर जायाप्पा न आले तर मल्हारबा कांही अगोदर येणार नाहीत. ऐसें आहे. तरी जायाप्पास पत्रे परस्परेंहि पाठवावी व आह्मांकडहि दोन तीन पाठवावी. ऐसें आहे. सारांश, इतका अटाहशा न करावा. परंतु तुर्त हे दोघेजण परस्परें कलह करून कोणी एक तरी बुडतो. दुसरें आपणास देशी पेंच मोगलाचा. दोन्हीहि गोष्टी दोलतेस पेच पडाव्याच्या आहेत. तुर्त आढळला मनसबा टाकून यावे हे कामाचें नाहीं. यासाठी आठपंधरा दिवस तापीतीरें आहों. पत्रं वरचेवरी पाठवावी. साहित्य करावें. इतकें करून कदाचित् दोघांतून एक ना ऐके तरी कसें करावं ते सविस्तर ल्याहावें. इकडे होईल तं वर्तमान वरचेवरी लेहन पाठवं. तेथून माणसें पाठविणे ती जलद पाठवीत जावी. दोघांसहि चार चार पत्रं देशी येणे ह्मणोन आह्माकडे पाठवावी. ह्मणजे आहीं याचा उपर त्यास, त्याचा उपर यास दाखवून घेऊन येतो. नाही तरी मोगलासीं तो कलह होईलसे वाटते व हे मदतीस येत नाही. रघोजीबावाचा यंदां संशयच आहे. आह्मी दोघांमध्ये शिरोन दोघांसहि परस्परें उपर दाखवून आणितों. काम मातब्बर. पुढे हातचे जाईल. हे भांडले तरी मग दोघांचा एकच होईल. तें कामाचे दिसत नाही. यास्तव याप्रमाणे करतो. उदैक कुच करून प्रकाशाकडे तापीसुमारे तीन कोस जाऊं. ११ सानदेश जिल्हयांत तापीवर आहे. तर