पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घेतले. मल्हारबा मजलदरमजल सेंधव्यास आले. मोगलाकडे त्याचे राजकारण आहे. त्याच्या सूत्रं किल्ले घेऊन आपण हिंदुस्थानास जातात. इकडे मोगलाने सल्ला बिघडावा. रघोजी भोसल्यास मोगलानें दबवून राखिलें. पुढें खामखा सैदलष्करखान, जानबा यांच्या मनांत एकवेळ उत्पात करून दिल्ही जहागीर फिरोन घ्यावी अथवा काही तरी आपलेसे करावे हा मनसबा परस्परें कळों आला. दुसरें सांप्रत जायाप्पाचे कागद येतात त्यांत मल्हारबाची व त्याची चित्तशुध नाहीं; वोढ करून, स्वतंत्र जाऊन उत्पात करावा ऐसें दिसते. याचप्रमाणे मल्हारबाकडीलहि पत्रं येतात त्यांतहि भाव हाच आहे. जायाप्पाचें केलें शेवटास न जावें. ऐसें परस्पर स्वजनअसल्यास ही तारीख ह्या पत्राची होय हे ठरेल. (१) रघुनाथराव ताप तीरावर प्रकाशाजवळ असला पाहिजे; (२) शिंदे होळकर दक्षिणेतून हिंदुस्थानांत परत जात असले पाहिजेत; व (३)जातांना त्यांनी देशी मोगलाचे किल्ले घेतले असले पाहिजेत. पैकी १७५२ च्या जूनांत शिंदे होळकर हिंदुस्थानांत परत न जातां उलटे गाजुद्दिनाला घेऊन दक्षिणेत देशी येत होते ( पत्रे व यादी ५।६।७ ). तेव्हां १७५२ तला हा साबान नव्हे. आतां १७५२ च्या अलीकडला ८ साबान २१ जून १७५१ ला पडतो. परंतु १७५१ च्या जूनांत शिंदे होळकर अंतर्वेदीत लडत होते ( पत्रे व यादी १६२।१६३ ). तेव्हां १७५१ चाहि साबान ह्या पत्राचा महिना नव्हे. आतां १७५१ च्या अलीकडील ८ साबान २ जूलै १७५० ला पडतो. शाहूमहाराज १७४९ च्या डिसेंबरच्या २३ व्या तारखेला वारले (थो. शा. च. पृ. १०१). त्यावेळी शिंदेहोळकर दक्षिणेत साताऱ्यास आले होते (धा. रा. च. पृ. ३ ). त्यांनी परत जातांना निजामाचे धोडप वगैरे किल्ले घेतले व ते घेऊन ते माळव्यांत उतरले. पुढे लवकरच रघुनाथरावाला गुजराथच्या कामगिरीला प्रथमच नाना साहेबांनी पाठविले. इतक्यांत प्रतिनिधि, ताराबाई, मोगल, इत्यादींनी अगदीं गहजब करून सोडला. तेव्हां सरदारांना परत आणावें असें नानासाहेबांनी रघुनाथरावास लिहिले; परंतु अनेक हरकती येऊन सरदारांना परत येता आले नाही. येणेप्रमाणे देशी येऊन परत जाण्याची, किल्ले घेण्याची व रघुनाथराव तापीतीरावर असण्याची संधि एकाच काल आली असे ह्या १७५० च्या जुलैंतच झाले. तेव्हां ह्या पत्राची पैवस्ती २ जूलै १७५० ची आहे हे स्पष्ट आहे. नानासाहेब १७५० च्या जुलैंत पुण्यास होते; तेव्हां तापी तीराहून त्यांना पत्र पोहोचण्यास फार झाले तर एक आठवडा लागावा. अर्थात् हे पत्र १७५० च्या जून. महिन्याच्या शेवटास लिहिले असावें. पत्रावरती तारीख पैवस्तीचीच दिली आहे. निबाळकर