पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सीवाय पेशकश सुबेदारीने जे काही मुतसदी पातशाई त्याचे जिम्मे साबीत करून देतील ते तहसील करोन, चौथ आपली वजा करून, बाकी सरकारांत पोहचती करीत जाऊं. व दरसुवेजात व फौजदारीहा दरोगे अदालतचे तरफ सरकारवालासी राहात आणि किल्लेदार ही बदस्तूर सरकारवालाचे राहात तगीरीबहाली किल्लेदाराची तालूक हजूर मोअकसी आहे; आह्मी हरगीज किल्लेजात व देहात पशरुत किल्लेदारां आणि दिवाणी व बुताती वगरे खिदमता पातशाई आणि लवाहक त्याचे व बागात व इमलाक पातशाईत तसरुफ व दखल न करूं. व भोगवटा प्राों तसरुफ मुतसदीयान पातशाईचे सोडूं व मदत व कुमकी राहूं व राहाणार. व वस्त व अज शहर पातशाईस राजी ठेवू; व तंबीह व पारपत्य किल्ले आणि हरामजादे रासत्यांत उपद्रव करणार व वाट मारणार आणि चोरांचा करूं की व्यापारी व मुसाफर पनाहात राहेत. व बंदाय पातशाईसी की जे जागीरदार जागीर ठेवीत असतां चाकरीत हाजीर नाहीत, माफक मुकम कुदसीचे महाल मजारफ काबील व मुरादाबाद, संबल, हिसार व बदाऊं ह्या सुभ्यांची चौथ आझाला आपण दिली आहे ती हुजरचे दोन हिस्से व वजीरबहादर व नवाबबहादर ह्यांच्या फौजेच्या खर्चाकरितां एक हिस्सा देण्याचे ठरलें आहे; तर मुलूख मजकूरचा बदोबस्त केल्यावर आह्मी आपली चौथ घेऊ. सुभेदारी पेशकशाशिवाय पातशाही जमेदार व रजवाड्यांच्या पेशकशांच्या ज्या बाबती हजूरचे कारकून लोक दाखवून देतील त्या वसूल करून, त्यांतून आपली चौथ काढून घेऊन बाकी सरकारांत पोचती करूं. सुभ्यांतील व फौजदारींतील अदालतींचे जे हुजुरनी किल्लेदार व दरोगे नेमले आहेत त्यांच्या नेमणुका व बदल्या हुजूरनींच कराव्या. किल्लेदारांना सोपविलेले किल्ले व गांव आणि दिवाणी व खानगी पातशाही खिदमता, तसेच त्यांचे लवाजमे व लवाहक व बागा व इमले ह्यांच्यावर आह्मीं जबरदस्तीने हक्क सांगणार नाही. पातशाही मुत्सद्यांच्या भोगवट्यास अडथळा करणार नाही, त्यांना मदत करूं व करीत जाऊं. पातशाही शहराच्या