पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

न फिरूं; आणि जनाब अकदस व नवाबबहादरासी एकसर मुतफावत न कर व जन्मपरियेंत ताबेदार व फर्माबरदार राहूं. व जर आह्मास दक्ष णेस जावयाचा अगत्य पडला तरी कारणं बंदगी जनाब अकदम व तंबीह व पारपत्य मुफसीदाचें कार्याकारण फौज सोडोन जाऊं; व आह्मी ज्या वायद्याचा करार करून जाऊं; त्याच कराराप्रों येऊ व सीपारस लहानथोरासी समजोनच करूं. आणि एहकाम शरीयतचे जारी राहत आह्मी मुकवी राहूं, व रसमीयात हिंदूचीहि आमचे धर्माप्रों जारी राहात. कोण्ही मुजाहीम त्यांचा न होय. आणि तीस लक्ष रुपये की कारणे मोहम अबदालीचे इनायत जाहाले काय येंदा व काय आइदे की ज्यावेळेस अबदाली येईल आज्ञेप्रमाणे त्याचे पारपत्यास यत्न करूं, व चौथ सुभेजात पंजाब व मुलतान व थठा व भकर व चार महाल मजारफ कानील व मुरादाबाद व संबल व हिसार व बदाऊ की मरहमत जाहाली, दोन हिस्से बराय सरकारवाला व एक हिस्सा कारणे फौज वीरुलमुमालीकबहादर आणि नवाबबहादराचे मुकरर जाहाले, बंदोबस्त मुलक मजकुराचा केलिया उपरांतिक घेतले जाईल. आणि पेशकशात मुकररी पातशाई जमीदारान व राजवाड्यासी बस्त ठेवू. जे जहागीरदार सरकार चाकरी करीत नसतील त्यांच्या जहागिरी सरकारांत दाखल करू, व त्यांतन आपली चौथ काढून घेऊ; आणि केलेल्या कौलकराराशी कधीहि फिरणार नाही. तसेंच हुजूरशी व नवाबबहादराशी कधीहि तफावत करणार नाही. आणि जन्मपर्यंत आपले ताबेदार राहूं. आझास जर दक्षणेस जाण्याचे अगत्य पडले तरी हुजरच्या चाकरीकरितां व शत्रंच्या पारिपत्याकरितां येथें फौज ठेवून जाऊं. तसेंच जो वायदा करून जाऊं त्याप्रमाणं बिनचूक परत येऊ. लहानथोरांची शिफारस आपल्यापाशी विचारपूर्वक करूं. आमी मुसलमानांच्या व हिंदूंच्या धर्माचे संरक्षण करूं. कोणाला अडथळा करू देणार नाही. ज्याअर्थी अबदालीवर मोहीम करण्याकरितां तीस लक्ष रुपये आपण आह्मास दिले आहेत त्या अर्थी अबदाली ह्या अगर पुढील वर्षी आल्यास त्याचे पारिपत्य करण्यास यत्न करूं. पंजाब, मुलतान, थटा, व भकर व चार