पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

यान उजाम आझी दोणी फिदवीयान मये फौज बराय बंदगी हाजीर राह. आणि जें कामें की कारणे पारपत्य अबदाली वगैरेचे आज्ञा होय जर योग्य ऐकिलें आमचंच असले तरी आह्मीच बजाऊं; आणि जर लायक मुदवजह होणे रायात खीला फात जाहाबाजीचे होत असेल तरी हमरकाब होऊन मसदर तरदुदेचे होऊ. आणि जर काबील तई फरमदन उमरायाचे होत असले तरी ज्यांत अमिराविषयी विनंति करूं तोच तैनात होय की बइतफाक | त्याचे त्या कामाचा सरंजाम करूं. ज्या वेळेस हुकम होईल ते समयीं हुजतबोजा दरमयान न आणूं. आणि आज्ञा जनाब अकदसेस बजाय कौल | करार आणि शपता आपलीचे बलकजादा धर्म आईन आपल्यासी जाणोन लिहिण्यापूर्वी या अहदनामयाचे ज्या जागा की अमील सरकारवालाचे खुद अमल व दखिलकाम आहेत त्या जागा दखल न करूं; व मदत व कुमक त्यांची करूं. व बंदहाय पातशाई की जे कोणी जागीरात खात असतां चाकरी नाही करीत जागीरात त्याची दाखल सरकारवालांत करवू आणि त्यांतून चौथ आपली घेऊ; व आपले कौल करारासी फौज, सरदार, शिपाई व तोफखाना आह्मी ठेवं ती हुजरतैनातींतील समजत जाची. आमी दोघे व इतर अमीरउमराव नित्याप्रमाणे हुजूर च्या सेवेत हजर राहूं. आणि अबदाली वगैरेंचे पारिपत्य करण्याचे कामी आमचाच सल्ला हुजूर ऐकतील तर तें काम आह्मी स्वतःच बजावं, आणि तें काम करण्यास हुजूरची स्वारी स्वतःच जाणे जरूर पडेल तर आह्मी आपल्या स्वारीबरोबर येऊ आणि जिवापाड मेहनत करूं. अथवा तें काम अमिरांच्या हातून होत असल्यास आह्मी विनंति करूं त्या अमिरांनाच पाठवावें, किंवा त्यांची सल्ला घेऊन तें काम आह्मी करूं. आपण आज्ञा कराल त्या वेळेस हुज्जत घालणार नाही. आणि केलेल्या कौलकराराखेरीज हुजूरवालाची आज्ञा विशेष मानून व धर्म व स्मृति ह्यांचे जागी आपली आज्ञा मानून, ह्या तहाच्या पूर्वी ज्या जागा हुजूरच्या खास ताब्यात होत्या त्या आह्मी आपल्या ताब्यात घेणार नाही इतकेच नव्हे तर त्या जागांचा बंदो