पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाद मये फौजदारी मथुरा वगैरे फौजदारीहा मुतआलीक त्याची मयेम शरुत सुबेदारीहा व फौजदारीहा व पेशकशात सुबदारीहा व फौजदारीह बंदेदरगाहास मुकरर जाहाली व मरहमत जाहाली. करार करितों व श. पथपूर्वक कौल करितों की, माफक मामूल मशरुत व पेशकशात सुबेदारीह व फौजदारीहा लायक अहवाल राजहा व जमीदाराचे आणि शिवाय त्याचे जे कांहीं लबाजीम व लवाहक सुबेदारी व फौजदारीचे होत असेत काबीज व मुतसरीफ होऊ. आणि बंदोबस्त सुबेजात व फौजदारीहा बवाकई कलं. आणि जे मुलूक की सीवाय तसरूफ पातशाईसी की दर तसरूफ राजहा व जमीदारात लहान मोठे सीवाय जमीदारी कदीम त्याची की मुलक पातशाईस तसरूफ केला आहे त्याचे हातांतून खलस करून व काढोन अर्धा दर तसरूफ मुतसदीयान पातशाईचे कलं व अर्धा कारण खर्च सीपाह आपलीचे घेऊ. आणि हंगाम खलस करणे, मुलक व पारपत्य करणे मुफसीदांचे ज्या प्रो फौज व सीपाह व सरदार व तोफखाना अफजुदरकाबाचे विज्ञप्त करूं हजुरांतून तैनात होत असावे व बदस्तुर उमराआहे. आणि पवित्र अजमीर सभ्याची सुभेदारी व नारनोल व सांभर वगैरेची फौजदारी व त्यांच्या मुतालिकी आणि अकबराबादेची सुभेदारी व मथुरा वगैरे यांची फौजदारी व मुतालिकी व दुस-या शर्तीतल्या सुभेदान्या व फौजदान्या व त्याचे नजराणे सेवकास मुकरर केले आहेत व बक्षिस दिले आहेत. ह्मणून आह्मी शपथपूर्वक कौलकरार करितों की ह्या सुभेदारींतील व फौजदारीतील राजांच्या व जमीदारांच्या अब्रूप्रमाणे मामूल वहिवाटीला अनुसरून सर्व अटी पाळीत जाऊ व त्या सुभेदारीचे व फौजदारीचे जे हक व लवाजम असतील त्यांचा कबजा घेऊ व सुभ्यांचा व फौजदा-यांचा पक्का बंदोबस्त करूं व पातशाही राजेरजवाड्यांचे ताब्यांतील मुलखांपैकी जुना प्रांत कोणी बळकाविला असेल तो त्याच्या ताब्यांतून काढून अर्धा सरकारांत देऊ व अर्धा सैन्याचे खर्चाकरितां आली आपलेकडे ठेवू. आणि एखादा प्रांत खालसा करण्याचे वेळेस व फिसायांचे पारिपत्य करण्याचे वेळेस जी अधिक