पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धीत ही पत्रे त्यांच्याजवळ आली ती त्यांनी देशी परत आल्यावर वाई येथे आपल्या वाड्यांत ठेवून दिली. ती १७६१ पासून १८९७ एप्रिलपर्यंत त्यांच्या वाड्यांतील एका अंबारांत एका कातड्याने मढविलेल्या पेटाऱ्यांत शाबूत, कोरीकरकरीत, जशीच्या तशीच पडून होती. ह्या पेटाऱ्यांत एकंदर सुमारे ७०० पत्रे होती; त्यांपैकों १८२ पत्रे पानिपतच्या मोहिमेसंबंधी वगैरे आहेत. बाकी राहिलेली पत्रे माधवरावाच्या कारकीर्दीतील हिंदुस्थानांतील घडामोडीसंबंधी खासगी व जमीन महसुलासंबंधी आहेत. ह्या सर्व पत्रांच्या तारखा प्रो. मोडक ह्यांच्या जंत्रीवरून ठरवून टाकिलेल्या आहेत. पत्रांतील कठिण शब्दांचे अर्थ प्रायः दिलेले नाहीत. कारण, अलीकडील २० वर्षांत काव्येतिहाससंग्रहाशी महाराष्ट्रवाचकांचा वराच परिचय झाला असल्यामुळे तें काम आतां न केले असतां चालण्यासारिखें आहे. शिवाय, आमचे एक मित्र सतराव्या व अठराव्या शतकांतील ऐतिहासिक लेखांतून आलेल्या कठिण शब्दांचा कोश तयार करीत आहेत व तो लवकरच छापून तयार होईल असा अजमास आहे. ही पत्रे वाचणारास महाराष्ट्राचा स्थूल इतिहास माहीत आहे असे गृहीत धरिलें आहे. पत्र कोणी कोणास लिहिले आहे हे पत्रांतूनच लिहिलेले असते व पत्र केव्हां लिहिलेले आहे हे प्रत्येक पत्राच्या मथळ्यावरील तारखेवरून समजून येईल. ही सर्व पत्रे १७५० पासून १७६२ च्या मधील अवधींतील असल्यामुळे ती कोणकोणत्या प्रसंगाला अनुलक्षून आहेत हे सहज कळून येण्यासारिखें आहे. शिवाय, ह्या ग्रंथांतील बहुतेक पत्रे संगतवार लागलेली आहेत. तेव्हां अमुक एक पत्र अमुक एका प्रसंगाला अनुलक्षून आहे हे समजण्याला अडचण यावी असें नाही. तरी वाचकांना संगतवार पत्रांचेंहि अनुसंधान सहज व्हावें ह्मणून इ. स. १७५० पासून १७६१ पर्यंतच्या सर्व मोहिमांचे तक्ते खाली देतो. ह्या तक्त्यांच्या, इतर इतिहासांच्या व पत्रांखाली दिलेल्या टिपांच्या साहाय्याने पत्रांचें अनुसंधान कळण्यास वास्तविक पाहिले तर हरकत पडूं नये. तक्ता पहिला.. नाना, भाऊ व विश्वासराव ह्यांच्या १७५० पासून १७६१ पर्यंतच्या हालचालींचा तक्ता. सन. महिना. . स्थल. तपशील. १७४९ डिसेंबर. सातारा. १५ डिसेंबर शाहूचा मृत्यु. १७५० जानेवारी पासून मावा प्रतिनिधीचें व यमाजी एप्रिल पर्यंत. शिवदेवाचें बंड. मे पासून भाऊ रामराजाला घेऊन प्रतिनिधीवर जातात. ताराबाई काही महिने पुण्यास. भाऊ सातारा, पंढरपूर, सांगोले, मंगळवेढें अक्टोबरपर्यंत. पुणे.