पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्वजनिक वाचनालय खेड, (गु.) श्रीशंकर. नकल फर्मान वालाशान बनाम बालाजी बाजीराव वलकाबहेकी या दिवसांत अहदनामा मल्हारराव होळकर बअलकाने व जयाजीराव शिंदे बअलकाबरुफकाये आंखुलासहऊसीपाहचे मजमूनहे की श्रीमहादेव व खंडेराव व धर्म व आईन आपले दरमीयान व जामीन आहेत राजश्रियाविराजित बाळाजी बाजीराव यांस दिलेल्या उच्च फरमानाची नक्कल. प्रस्तुत राजश्री मल्हारराव होळकर व पातशहाचे दोस्त आणि वीरशिरोमणि जयाजीराव शिंदे यांच्याशी तह येणेप्रमाणे केला जातो की १ हा अहदनामा ह्मणजे करारनामा दिल्लीचा पातशहा आणि मराठ्याकडाल सरदार मल्हारराव होळकर व जयाप्पा शिंदे ह्यांच्यामध्ये झाला, असें ह्या करारनाम्यांतच लिहिले आहे. हा करारनामा बहुशः १७५० सालांत झाला असावा. ह्यावेळी दिल्लीचा पातशहा अहमदशहा तख्तावर होता. । पातशहाचा मुख्य वजीर सफदरजंग ह्याने रोहिल्यांचा व अहमदशहा अबदाली ह्याचा दंगा मोडण्याकरितां मराठ्यांना मदतसि बोलाविलें. ह्या अहदनाम्यांत नबाबबहादर व वजीरबहादर ह्मणून जें नांव येतें तें ह्या सफदरजंगाचे होय. मुलतान, पंजाब, सिंध, रजपुताना व रोहिलखंड इतक्या विस्तीर्ण प्रदेशांवर चौथ बसविण्याचा हक्क मराठ्यांना ह्याच करारनाम्याच्या जोरावर प्राप्त झाला व ह्या हक्काच्या संरक्षणाथ पुढ सहा वर्षे अबदालीशी, रोहिल्यांशी व रजपुतांशी त्यांना झंजावें लागलें. मुळांत ह्या अहदनाम्याचे दोन भाग केलेले आहेत. पूर्वार्धाला अजी ह्मणून म्हटले असून, उत्तरार्धाला अर्जीचे उत्तर ह्मणून पटले आहे. पूर्वार्धात अमुक अमुक कामगिऱ्या अमुक अमुक किफायती करिता आह्मीं करूं असा मराठ्यांच्या तर्फेने अर्ज केला आहे व त्याचे उत्तर उतरार्धात दिले आहे. पूर्वार्धाची उत्तरार्ध बहुतेक पुनरावृत्ति आहे. " आह्मी करूं " हे पूर्वार्धात वाक्य आहे व “ तुह्मीं करावें" हे उत्तरार्धात आहे. मूळ करारनामा फारशीत लिहिलेला असावा. त्याचे भाषांतर मराठ्यांच्या सरदारांना कळण्याकरितां मराठीत केलेले आमच्या जवळील दफ्तरांत होते. अहदनाम्यांतील मराठी भाषा बहुतेक फारशीच आहे. क्रियापदें मात्र मराठी आहेत. विभक्त्यांचे प्रयोग देखील फारशाच्याच धर्तीवर केले आहेत; ह्मणून या उत्तर