पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११३ (३) ऐतिहासिकलेखसंग्रहातील १५१ व्या पत्राच्या तिसऱ्या ओळीत १७ जमादि लाखरी मंगळवार सांगितला आहे; १५३ व्या पत्रांत १८ जमादिलाखरी मंगळवार सांगितला आहे व ह्याच १५३ व्या पत्रांत अमावास्येला गुरुवार लिहिला आहे. १५३ वें पत्र गुरुवारी लिहिले आहे ह्यांत संशय नाहीं; कारण “ काली” बुधवार होता ह्मणून पत्र लिहिणारा पुढे लिहितो. गुरुवारी अमावास्या होती किंवा नाही एवढीच शंका आहे. १७ व १८ तारखा चुकल्या आहेत हे निर्विवाद आहे. स. (४) काव्येतिहाससंग्रह, पवें, यादी वगैरे ८ त आषाढ वद्य ५ ला रविवार व १० ला शुक्रवार आहे; जंत्रीत ह्या दोन्ही तिथीस अनुक्रमें सोमवार व शनवार आहे. उत्तर चोवीस रमजान शनवारी लिहिले आहे. पत्र शुक्रवारी २३ रमजानला आले. शुक्रवारी पेशव्यांच्या पंचांगांत १० मी होती. या (५) काव्येतिहाससंग्रह, पत्रे व यादी १७ च्या पैवस्तीत ज्येष्ठ शुद्ध १५ सोमवारी आहे; जंत्रीत पूर्णिमेचा क्षय आहे. (६) काव्येतिहाससंग्रह, पत्रे व यादी ४२९ त ३९३ पृष्टाच्या खालून ३ या ओळीत शके १६५२ साधारणनाम संवत्सरी फाल्गुन शुद्ध ३ ला मंदवार दिला आहे; जंत्रीत रविवार आहे. पत्रांतल्याप्रमाणे शनवारी दोनप्रहरी दिवसा ३ या होती. तेव्हां रविवारी जो तृतीयेचा शेष राहिला असेल त्याच्या जोरावर रविवारी ३ या होऊ शकेल की काय? (७) काव्येतिहाससंग्रह, पत्रे व यादी ४३० त चैत्र शुद्ध ३ ला इंदुवासर दिला आहे; जंत्रीत मंगळवार आहे. (८) भारतवर्ष, पत्रे, यादी वगैरे १ त मार्गशीर्ष शद्ध १२ स दोनप्रहरी मंदवार दिला आहे; जंत्रीत १२ शुक्रवारी आहे. ह्याच पत्रांत आणीक पांच ठिकाणी सन, शक, राजशक, तीथ, वार, तारिख वगैरे दिली आहेत. त्यापैकी काहींना काहीतरी मूळपत्रांत किंवा लेखांकाच्या नकलेंत किंवा संपादकाच्या नजर चुकीने चुकले असल्यामुळे ह्या तीथवारांसंबंधी माझें कांहींच ह्मणणे नाही. हे मासिकपुस्तक मोठ्या अव्यवस्थितपणे संपादिले जात असल्यामुळे ह्याच्यांतील आंकड्यांवर विश्वास ठेववत नाही. - पत्रांतील व जंत्रीतील फरक दाखविण्याकरितां आणीकहि पुष्कळ दाखले देण्यांत येतील; परंतु, एवढ्यावरच काम भागण्यासारखे असल्यामुळे जास्त विस्तार करीत नाही. प्रो. मोडकांनी इ. स. १७२८ पासून १८९४ पर्यंत जंत्री तयार केल्यामुळे ह्या अवधीतील मराठ्यांच्या कागदपत्रांचा अभ्यास करणाऱ्यांस मोठी सोय झाली आहे. जर प्रो० मोडक इ० स० १५०० पासून १७२८ पर्यंत दुसरी एक जत्री छापतील तर त्या वेळच्याहि कागदपत्रांचा अभ्यास करण्याचे एक उपकरण तयार झाल्यासारखे होईल. शहाजी, शिवाजी, राजाराम व शाह ह्यांच्या वेळची जंत्री अवश्य पाहिजे आहे. तीत दिल्ली येथील जुलुसी सनाच्या तारखा आल्यास फार उपयोग होईल.