पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अणजे १७६३ च्या १० जानेवारीला केला ह्मणून बखरीच्या प्रारंभी लिहिले आहे. झणजे ही बखर सजवावयाला ४१ दिवस लागले असें होतें. ह्या बखरीतील लढाईची ताराख चुकली आहे. भाऊ व विश्वासराव रणांत पडल्यावर मग बाळाजी बाजीराव पुण्याहून उत्तरेकडे निघाले असें रघुनाथ यादव दफात्यावरून लिहितो ह्मणून ह्मणतो. परंतु बाळाजी बाजीराव पानिपतच्या लढाईच्या अगोदर हिंदुस्थानास जाण्यास पुण्याहून निघाले हे निर्विवाद आहे. तेव्हां रघुनाथ यादवाने दफात्याचा नीट उपयोग केला नाही असे झणावे लागते. माहितीपेक्षां वर्णनाने ही बखर जास्त फुलविलेली आहे. (क) कांही लहान सहान चुका गाळल्या असतां भाऊसाहेबांची कैफियत बहुतेक पूर्णपणे विश्वसनीय आहे. (ड) बऱ्याच चुका गाळल्या असतां भाऊसाहेबांची बखर बहुतेक बरीच विश्वसनीय आहे. भाऊसाहेबाचा तोतया निर्माण व्हावयाच्या अगोदर ह्मणजे १७६३ च्या अगोदर ही बखर लिहिली आहे. तुंगारप्रतीच्या शेवटी १७१२ शकाच्याबद्दल १७१३ पाहिजे ह्मणजे सवत्सराचें नांव, तिथि व चंद्र बरोबर होतात. विवेचन बारावें. कोल्हापूर येथील प्रो. मोडक ह्यांच्या जंत्रीचा उपयोग मला अतिशय झाला. ह्या जत्रात चूक ह्मणून फारशी कोठे नाही. कधी कधी तिथींचे वार व मुसुलमानी तारखांचे चार जत्रात व ऐतिहासिक पत्रांत निराळे सांपडतात. प्रो. मोडक ह्यांच्या जंत्रांतील तिथी, सारखाव वार जर ठाम बरोबर असतील तर पत्रांतील तीथि, वार व तारीख मोडकांच्या जनात जय जथ जमत नाहींत तेथे तेथे एकच अनमान करणें प्राप्त होतें तं हें की, प्रा. मोडकाना ज्या जत्रीवरून व पंचांगावरून आपली जंत्री रचिली तो जंत्री व ती पंचागें पत्र लिाहणान्यांच्याजवळ जी पंचांगें होती त्यांच्याहन निराळी असावी. क्षय व वद्धि ह्या तिथि निरानराळ्या प्रांतांतील पंचांगांत निरनिराळ्या दिवशी कदाचित् असं शकतील: परंत, इतर तथा निरानराळ्या प्रांतांतील पंचांगांत निरनिराळ्या वारी कां असाव्या ह्याचे कारण समजत नाहा. तसंच तारखांचें वारहि निरनिराळ्या पंचांगांत कां बदलावे तेंहि नीट समजत नाही. उदाहरणार्थ काही पत्रांच्या तारखा खाली देतो. (१) एतिहासिकलेखसंग्रहांतील १७७ व्या पत्रांत फाल्गन शुद्ध चतुथीं बधवारों आह झणून लिहिले आहे. प्रो. मोडकांच्या जत्रांत चतर्थी गरुवारी आहे. त्यावरून मथाळ्यावराल इंग्रजी तारीख १७ फेबुवारी हाणन मांडली आहे. पत्र ज्याअर्थी बुधवारी चतुर्थ प्रहरी झणजे सध्याच्या दुपारच्या तीनपासून सहा वाजेपर्यंतच्या कालांत केव्हां तरी लिहिले आहे त्याअर्थी बुधवार हा चार खरा व बधवारचीच इंग्रजी तारीख घेतली पाहिजे. तसेच बुधवारी चतुर्थी होती हेहि कबूल केले पाहिजे. (२) एतिहासिकलेखसंग्रहांतील १७९ व्या पत्रांतं फालान वद्य ७ ला मंदवार आहे; परंतु, जंत्रींत रविवार आहे.