पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बखरीवरून, आजपर्यंत जे स्वदेशी व विदेशी इतिहासकार झाले त्यांनी, पानिपतच्या लढाईचे वर्णन केले आहे. ग्रांटडफ्चा देखील मख्य आधार काशीराजाचीच बखर आहे. रा. नातू ह्यांना म त्र कोठे कोठे इतर बखरींचा उपयोग केला आहे. परंतु त्यांचा देखील कल इंग्रजइतिहासकारांच्या मताला मान देऊन, काशीराजाच्याच वृत्तांताकडे व प्याचा दिसतो. तेव्हां काशीराजाच्या बखरीची ग्राह्याग्राह्यता ठरविणे अत्यंत जरूर आहे. काशीराजाच्या बखरीतील खालील गोष्टी इतिहासाला धरून नाहीत असे ह्या ग्रंथांतील पत्रांवरून कळून येण्यासारिखे आहे. ( १ ) वाळाजी बाजीराव ख्यालीखुशालीत मग्न असे. १७३८ पासून १७६१ पर्यंत वर्षांतून आठ नऊ महिने बालाजी पुण्याच्या बाहेर असे हे मी मागे दाखवून दिले आहे. ( २ ) सदाशिवरावाला रामचंद्र मल्हाराची लहानपणापासून शिक्षा होती ह्मणून काशीराज ह्मणतो; परंतु, सदाशिवरावाची व रामचंद्र मल्हाराची गांठ १७५० त पडली. त्यापूर्वी भाऊला बाळाजीची शिक्षा होती. (३) रघुनाथरावाच्या लाहोरच्या स्वारीत जनकोजी शिंदे होता ह्मणून काशीराज लिहितो; तोह निराधार आहे. ( ४ ) उदगीरची लढाई काशीराजाला माहीत नव्हती असे दिसते. (५) भाऊ उद्दाम झाला ह्मणून काशीराजाचें मगणे आहे; परंतु, ह्या ग्रंथांत भाऊची गोविंदपंताला गेलेली पत्रे किती सौम्यपणाने लिहिलेली आहेत हे पा लें मगजे उद्दामपणाचा आरोप भाऊवर आणणे मुष्कील होतें. (६) दत्ताजी शिंदे नजीबखानाशी युद्ध करीत असतां रणांत पडला व त्यावेळी अबदाली दूर अंतर्वेदात होता अशी काशीराजाची माहिती आहे; परंत, ती ह्या ग्रंथांतील लेखांक १:५ वगैरेवरून निराधार आहे हे कळून येईल. (७) भाऊने दिल्लीस तळ दिल्यावर सुजाउद्दौला अबदालीला मिळाला ह्मणून काशीराज ह्मणतो; परंतु, भाऊ दिल्लीस येण्याच्या अगोदर सुजा अबदालीला मिळाला होता हे पांचव्या विवेचनांत दाखवून दिले आहे. ( ८ ) कुंजपुरा घेतल्यावर भाऊ दिल्ली शहरास परत आला व तेथें दसन्यास त्याने आपल्या सैन्य ची गणती केली असें काशीराज लिहितो; परंतु, कुंजयास गेल्यावर भाऊ दिल्लीस कधी आलाच नाही हे मागे दाखविलेच आहे. (९) संभाजकिया यर्थाल लढाईत अबदाली विजयी झाला ह्मणून काशीराजाचे ह्मणणे आहे; परंतु, त्या लढाईत मराठे शेर झाले ह्मणून कृष्ण जोशी लिहितो. (१०) गणपतराव मेहेंदळ्याच्या अगोदर गोविंदपंत वारला ह्मणून काशीराज लिहितो; परंतु, ती चूक आहे हे ह्या ग्रंथांतील ३२३ टिपेवरून कळून येईल. येणेप्रमाणे काशीराजाच्या बखरीतील अग्राह्य भाग आहे. त्याने स्वदृष्टीने जेवढे पाहिलं तेवढें बहुश: खरे आहे. बाकीचे सर्व इतर अस्सल आधार असल्यावांचून विश्वसनीय धरवत नाही. (ब) रघुनाथयादवकृत पाणिपतची बखरहि मोठ्या कसोशीने पारखून घेतली पाहिजे. ही बखर शके १६८४ चित्रभानुनामसंवत्सरे माहे फाल्गुन शुद्ध ५ मदवारी पुणे येथें संपविली मगून रवनाथ यादव ह्मणतो. परंतु फाल्गुन शुद्ध ५ मीला मंदवार नसून शुक्रवार आहे त्याअर्थी मित्तीवर विश्वास ठेववत नाही. बखरीला प्रारंभ २५ जमादिलावरों