पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१९) पुणे ते नागपूर:-पुणे, औरंगाबाद, दाभाडी, जाफराबाद, बाळापूर अलज पूर, नागपूर. (१७) पुणे तें धारूर:-पुणे, गारपीर, थेऊर, करखंब, साळूमाळूचें पारगांव, वाळकी, मांडवगण, आडळगांव, भोसेगांव, सिंगवी, फकरावादधानारें, बारशी, खडे, पानगांव, गारदौंड, पेडगांव, परिंडा, बीड, धारूर. (१८) पुणे ते भागानगरः-पुणे, सुपे, बारामती, तुळजापूर, कल्याण, बेदर, भालकी, उदगीर, गोवळकोंडा, भागानगर. पुण्याहून फुटणाऱ्या मोठमोठ्या मागांपैकी काहींचा हा ठोकळ तपशील आहे. ह्या मार्गावरून माणसें, बैल, घोडी, उंटें, हत्ती, पालख्या, मेग वगैरे वाहनांचा रिघाव यथास्थित होत असे. माकाडामाने १७८० च्या पुढे शोधून काढिलेली खडीच्या सडका करण्याची युक्ति मराठ्यांना त्यावेळी ह्मणजे १७६० त माहीत नव्हती हे सांगावयाला नकोच. परतु त्यावेळच्या इंग्लंडांतील व यूरोपांतील रस्त्यांची स्थिति लक्ष्यांत आणिली असतां दुिस्थानांतील रस्ते उत्तम होते असेंच ह्मणावे लागते. पेशव्यांच्या राज्यांत सरकारी डाकेचा कारखाना मोठा असे. सरकारी डाकेबरोबरच खासगी लोकांचीहि पत्रे जात असत. डाकेच्या व रस्त्याच्या बाबींत १७६० त यूरोपखंड हिंदस्थानाच्या फारसें पुढे होते असे नाही. सरकारी डाकेपेक्षां सावकारी डाक जलद पोहोचत असे. सध्यांच्यापेक्षा त्यावेळी महाराष्ट्रातील लोक भरतखंडाच्या सर्व प्रातांत जास्त प्रवास करीत असत. कांक माकन न्यान दतांतूनहि सफरी कोंकणांतील लोकांस कराव्या लागत. द्वारकेपासून गोकर्ण पर्यत तराडी व महागिन्या सारख्या चालू असत. परंत किनारा सोडून पांच पचवास कोंसांच्या पलीकडे जाण्यास मराठी तारवें फारशी धजत नसत. विवेचन अकरावे. पानिपतची मोहीम १५ मार्च १७६० ला सुरू झाली व १४ जानेवारी १७६१ ला संपली. ह्या दहा महिन्यांचा सविस्तर वृत्तांत मी छापिलेल्या पत्रांखेरीज इतरत्र कोठे सांपडण्यासारखा नाही. (१) पानिपतच्या बखरीत नसल्या पानिपतच्या लढाईचा कमजास्त विश्वसनीय असा वृत्तांत दिला आहे. (२) भाऊसाहेबाच्या कैफियतीत सदाशिवराव आंने पडदुराहून निघाल्यापासून पानिपतची लढाई होईतोपर्यंत त्रोटक वृत्तांत आहे. ( ३ ) भाऊसाहेबाच्या बखरीत १७५४ पासून १७६१ जानेवारी यंत हकीकत आहे. त्यांत ९० पासून १३२ पृष्ठांपर्यंतचा मजकर पानिपतच्या मोहिमेसंबंधी व खुद्द लढाई सबंधी आहे. (४) काशीराजाच्या बखरीत सुजाउद्दौल्याकडील पानिपताच्या मोहिमेचे वर्णन आहे. (५) मराठ्यांच्या पराक्रमकाराने छापिलेल्या पानिपतच्या अपूर्ण बखरीत पानिपतच्या लढाईचा बनावट वृत्तांत आहे. ह्या पांच बखरी पानिपतच्या लढाईसंवधों आजपर्यंत प्रसिद्ध झाल्या आहेत. पैकी पराक्रमकारांची बखर वनावट असल्यामुळे ( टीप २९० पहा ) तिचा विचार करण्याचे यथे कारण नाहा. बाकीच्या ४ बखरींपैकी काशीराजाच्या