पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करीत व यूरोपांतील प्रधानांना हा शिपायगिरीचा धंदा बहुशः माहीत नसे. सारांश, शिवाजीच्या प्रधानमंडळींचें साम्य यूरोपांतील कोणत्याहि शतकांतील क्याबिनेटशी नाही. शिवाजीने केवळ मुसुलमानांचा कित्ता गिरविलेला आहे. तेव्हां ह्या क्लृप्तीत सूचित होणारी (व) आणि (क) ही कलमें पूर्वग्रहात्मक होत हे उघड आहे. सत्यासत्य पद्धतींची भेसन होते ती ही अशी होते. ह्या भेसळीला फार जपले पाहिजे. ( ५ ) उपमान प्रमाणावर कोणताहि सिद्धांत ठरवू नये. ही पांच कलमें लक्ष्यात ठेवून इतिहासरचना केली असतां ती सन्मान्य होईल ह्यांत संशय नाही. मराठ्यांच्या राष्ट्राच्या जीवनचरित्राचा अभ्यास अनेक दिशांनी केला पाहिजे. (१) मराठ्यांचा सामाजिक इतिहास, ( २ ) मराठ्यांचा राजकीय इतिहास, (३) मराठ्यांच्या धर्माचा इतिहास, (४) मराठ्यांच्या संस्कृतीचा इतिहास, (५) मराठ्यांच्या भाषेचा इतिहास, (६) मराठ्यांच्या मोहिमांचा इतिहास, (७) मराठ्यांच्या लष्कराचा इतिहास, (८) मराठ्यांच्या आरमाराचा इतिहास, (९) मराठ्यांच्या कायदेकानूंचा इतिहास, (१०) मराठ्यांच्या किल्ल्यांचा इतिहास, (११) मराठ्यांच्या जमीनमहसुलाचा इतिहास वगैरे शाखांचा सशास्त्र व सोपपत्तिक असा अभ्यास झाला पाहिजे. मराठ्यांच्या राजकीय इतिहा चा सध्या येथे विचार चालला आहे, तव्हा त्याचे विभाग सशास्त्र किती करितां येतील तें स्थूलमानाने सांगतो. (१)इ. स. १६४६ पर्यंत शिवाजाच्या पूचीचा इतिहास.(२) १६४६ पासून १६८० पर्यंतचा स्वातंत्र्यार्थ लढाईचा इतिहास. ( ३ ) १६८० पास्न १७०७ पर्यंतच्या स्वातंत्रयार्थ लढाईच्या शेपटाचा इतिहास. (४) १७०७ पासून १७३१ पर्यंतचा स्वराज्यस्थापनेचा व हिंदुपदवादशाहीचा शतहास. (५) १७:१ पासून १७६१ पर्यंतचा ब्राह्मणपदवादशाहीचा इतिहास. (६) १७६१ पासून १७९६ पर्यंतचा ब्राह्मणपदबादशाहीच्या जगवणकेचा इतिहास. (७) १७९६ पासून १८१८ पर्यंतचा महारा साम्राज्याच्या हासाचा इतिहास. ( ८) १८१८ पासून १८९८ पर्यंतचा महाराष्ट्राच्या अवनतीचा इतिहास. मराठ्यांच्या इतिहासाच्या ह्या विभागांबरोबर महाराष्ट्राच्या भज्ञानाचाहि अभ्यास झाला पाहिजे. विवेचन दहावें. सतराव्या व अठराव्या शतकांत महाराष्ट्रांतील लोकांच्या अंगी स्थितीपेक्षां गतचिंच प्राबल्य विशेष होते. पावसाळ्याचे चार महिने खेरीजकरून बाकीचे आठ महिने मराठे पुण्याहृन दाही दिशांभर पसरत असत. अठराव्या शतकांत मराठ्यांच्या गतीचे मुख्य केंद्र पुणे शहर होते. मुसुलमानांच्या कारकीर्दीतहि पुण्याचे ठिकाण मोहिमांची सुरवात करण्यास सोईचे समजले जात असे व त्याच्या ह्या सोयीस्कर स्थानावरून त्यांनी त्याला माहिमाबाद असें अन्वर्थक नांव दिले होते. सातारा व सासवड ही स्थलें सोडून पेशव्यांनी आपलें ठाणे पुण्यास दिले त्याचे तरी मुख्य कारण हेच. हिंदुस्थानांत, कोंकणांत, गुजराथेंत, श्रीरंगपट्टणास व निजामाच्या राज्यांत जाण्यास पुण्याच्या मैदानांतून अनेक रस्ते फुटतात. त्यांपैकी काही मुख्य मुख्य मार्गाचा व मुक्कामांचा येथे तपशील देतो.