पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानात्मक राज्यपद्धतीविषयीं क्लप्ति पहा. ह्या क्लप्तीत तीन सिद्धांत ठरवावयाचे आहेत. ( अ ) शिवाजीची राज्यपद्धति अष्टप्रधानात्मक होती; (व ) ती मुसुलमानांच्या राज्यपद्धतीहून निराको होती; ( क ) व यूरोपांतील क्याबिनेट गव्हर्नमेंटसारखी ती होती. ह्या क्लुप्तोतोल पहिला भाग ह्मणजे (अ ) तेवढा बवंशी पश्चाद्ग्रहोत्पन्न ह्मणने साधार आहे. शिवाजीच्या ज्या बखरी व एक दोन अस्सल कागदपत्र आजपर्यंत प्रसिद्ध झाले आहेत त्यांच्या आधारावर शिवाजीची. राज्यपद्धति ( अष्ट ) प्रधानात्मक होती असे विधान करण्यास कांहीं एक हरकत नाही. आता त्या प्रधानांची संख्या आठ होती किंवा त्याहून जास्त होती ह्या गोष्टीचा विचार करणे जरूर आहे. काव्येतिहाससंग्रहांतील ४०४ हे पत्र शिवाजीच्या राज्याभिषेकाच्या वेळचा कानूजाबता आहे. ह्या पत्रांत मुख्य प्रधान, अमात्य, सचिव, सेनापति,, पंडितराव, न्यायाधीश, मता, चिटणीस, सुमंत, बक्षी, सेनाधुरंधर, अशा अकरा अधिकाऱ्यांची प्रधानांत गणना कला आहे. ( इ ) युद्धांदि प्रसंग किंवा (फ) राजपत्रांवर चिन्ह करण्याचा अधिकार ज्याना असेल ते प्रधान होत असा ह्या कानूजाबत्यांतील मायन्याचा आशय दिसतो. ह्या आशयाप्रमाणे वर दिलेले अकरा अधिकारी प्रधान ठरतात. परंतु ह्या कानूजावत्यांच्या शवटल्या कलमांत ह्या प्रधान मंडळाला अष्ट प्रधान ह्मणून संज्ञा दिली आहे. तेव्हां अष्टप्रधान ही संज्ञा विशिष्ट संख्यावाचक नसून केवळ समुदायवाचक आहे असा सिद्धांत काढणे अवश्य होते. ह्या सिद्धांताला पोषक असें शिवाजांच्या कारकीर्दीतील दुसरें एखादें पत्र अद्यापपयत उपलब्ध नाही. परंतु, राजारामाच्या कारकीर्दीत अष्ट प्रधानांत एकंदर नऊ असाम्या होत्या अस राजारामाच्या वखरीवरून ठरते. तसेच शाहूमहाराजांच्या कारकीर्दीतहि नऊ असाम्या हात्या असें काव्येतिहाससंग्रहांतील ४०५ पत्रावरून कबूल करावे लागते. अष्ट प्रधानांचा सख्या शिवाजीच्या पुढें आठच नव्हती हे ह्या दोन आधारावरून सिद्ध आहे, व तोच प्रकार शिवाजीच्या वेळीहि होता, हे ४०४ पत्रावरून उघड आहे. हा वाद आठ ह्या संख्येपुरताच आहे. बाकी शिवाजीची राज्यपद्धति ( अष्ट ) प्रधानात्मक होती हा सिद्धांत साधार आहे हे निर्विवाद आहे. ( ब ) आतां ही राज्यपद्धति शिवाजीनें अजीबात नवीन शोधून काढिली किंवा मुसलमानापासून घेतली किंवा पूर्वीच्या संस्कृत नीतिशास्त्रांतून घेतली ? माझ्या मते शिवाजीनें ही राज्यपद्धति मुसुलमानांपासून घेतली. पेशवा, मुजुमदार, वाकनीस, सुरनीस, डबीर वगैरे अधिकाऱ्यांची नांवें मुसुलमानांच्या दरबारांतील आहेत. त्यांना मुख्य प्रधान, अमात्य, मंत्री, सचिव, सुमंत वगैरे संस्कृत नांवे शिवाजाने दिली. वाकी शिवाजीची पद्धति मुसुलमानांच्या पद्धतीचेच हुबेहुब अनुकरण होतें. ( क ) ही अष्टप्रधानात्मक पद्धत प्रस्तुतच्या यूरोपांतील क्याविनेट पद्धतीप्रमाणे तर नव्हतीच; परंतु, सतराव्या शतकांतील यूरोपांतील कित्येक देशांतील क्याबिनेट पद्धतीप्रमाणे ती काहीशी होती. शिवाजीच्या पद्धतींत व सतराव्या शतकांतील यूरोपियन पद्धतींत अंतर असें आहे की शिवाजीचे न्यायाधीश व पंडितराव ह्या दोन प्रधानांखेरीज बाकीचे सर्व प्रधान लढाया