पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हे अमूल्य फायदे ह्या दफ्तरांच्या प्रसिद्धीकरणापासून त्यांच्या मालकांस होण्यासारिखे आहेत. इतर लोकांस व संपूर्ण देशास फायदे काय होतील हे सर्वत्र महशूर असल्यामुळे त्यांचे येथ संकीर्तन करीत नाही. ८. हाच हेतु मनांत धरून मी ही पत्रे प्रसिद्ध केली आहेत. प्रस्तुत ग्रंथांत एकंदर ३०४ पत्रे आहेत. ती सर्व १७५० पासून १७६१ पर्यंतच्या अवधींतील ह्मणजे शाहूराजाच्या मृत्यूपासून (१५ डिसेंबर १७४९ पासून) पानिपतची लढाई होऊन दहा अकरा महिन्यांपर्यंतच्या ( नोव्हेंबर १७६१) अवधीतील आहेत. १७५० तील ३, १७५१ तील ११, १७५३ तील ७, १७५४ तील २०, १७५५ तील ८, १७५६ तील १, १७५७ तील ७०, १७५८ तील ५, १७५९ तील २३, १७६० तील १२५ व १७६१ तील ३१ अशी ह्या पत्रांची सालवारीने गणना करितां येईल. विषयवारीने गणना केली तर १७५० तील ३ पत्रांपैकी लेखांक १ दिल्लीतील पातशाहाशी झालेल्या तहासंबंधी आहे; लेखांक २ रघुनाथरावाच्या १७५०तील खानदेश-गुजराथेतील मोहिमेसबंधी आहे व लेखांक २६ शाहूराजाच्या नांवाने वाळाजी बाजीरावाने पाठविलेलें आज्ञापत्र आहे. हे आज्ञापत्र शाहूच्या मृत्यूनंतर लिहिलेले असून त्याच्यावर शाडूराजाच्या नांवाचा शिक्का आहे; परंतु, ह्याच्याच जोडीला, काव्येतिहाससंग्रहांतील ३३४ वें पत्र आहे. हे ३३४ वें पत्र २९ सप्टेंबर १७५१ त लिहिले आहे. असे असून त्याच्यावर शाहूराजाच्या नांवाचा शिक्का आहे; १७५१ तील ११ पत्रे १७५१ त सलाबतजंग व नानासाहेब ह्यांच्यांत झालेल्या झटापटींच्या अगोदरची आहेत. १७५० तील एकहि पत्र नाही. १७५३ तील ७ पत्रांपैकी लेखांक १४, १५, १६, १७, १८ हे लेखांक भालकीचा तह झाल्यानंतर नानासाहेब व बूसी ह्यांच्यांत उत्पन्न झालेल्या स्नेहाविषयी आहेत. व लेखांक २७, २८ रघुनाथराव गुजराथेहून थालनेरास आल्यावरची आहेत. १७५४ तील २० पत्रांपैकी लेखांक १९, २०, २१, २२, २३, २४ ही मुसाबुसी व सलाबतजंग ह्यांसंबंधी आहेत. व लेखांक २९ पासून लेखांक ४२ सुद्धां रघुनाथरावाच्या १७५४ तील हिंदुस्थानांतील मोहिमेसंबंधी आहेत. लेखांक ४१त सफदरजंगाच्या मृत्यूचें वर्तमान आहे. १७५५ तील ८ पत्रांपैकी लेखांक ४३,४४,४५,४६, ४७, ४९ व ५० ही पत्रं रघुनाथराव व जयाप्पा रजपुताना व हिंदुस्थान ह्या प्रदेशांत असतांना लिहिलेली आहेत. लेखांक ४८ हे पत्र १७५५ तील नसून १७५८ तील आहे. ह्या पत्राचा सन चार आहे. दिल्लीस व दिल्लीभोवतालच्या प्रांतांत पातशाहाच्या सिंहासनारोहणापासून सन मोजण्याची चाल असे. अलमगीर पातशाहा १७५४च्या जुलैत सिंहासनारूढ झाला ( पत्रे व यादी ३२ व Keene ). त्यावेळी सहर्सन खमसखमसैन होता. तेव्हांपासून चवथें साल मटले ह्मणजे समानखमसैन येते. त्या सालच्या जमादिलावलांत हैं पत्र लिहिले आहे. जमादिलावलाच्या २० तारखेला अबदालीचा एलची दिल्लीच्या पातशाहाला भेटावयाला आला होता ह्मणून पत्रकार लिहितो; त्याअर्थी हे पत्र २० तारखेनंतर