पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तरी कसा असा प्रश्न साहजिक उद्भवतो. ह्याला उत्तर असे आहे की मराठ्यांचा इतिहास शास्त्रीय पद्धतीने लिहिला तरच त्याला काही किंमत देतां येईल. इतिहास लिहिण्यात प्रस्तुतची संधि महाराष्ट्रांतील लोकांना मोठी उत्तम आली अहे. इतिहास उत्तम तन्हें कसा लिहिता येईल ह्याची फोड युरोपांतील शास्त्रयांनी करून ठेविलेली आहे. ह्या फोडार फायदा करून घेऊन मराठ्यांच्या इतिहासाची इमारत उभारली पाहिजे. यूरोपांत सत राव्या व अठराव्या शतकांत इतिहासकारांनी व चरित्रकारांनी ज्या चुक्या केल्या त्याच जर आपण एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी करूं लागलों तर एकोणिसाव्या शतकांतील यूरोपाशी आपला परिचय व्यर्थ झाला असे होईल. मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांनी खालील कलमें लक्ष्यांत बाळगली पाहिजेत. (१) कोणताहि पूर्वग्रह घेऊन इतिहास किंवा चरित्र लिहावयास लागू नये. आतापर्यंत लिहिलेल्या बहुतेक चरित्रांतून हा दोष ढळढळीत दिसून येतो. महादजी शिंदे, गोविंदपंत बुंदेले, परशरामभाऊ पटवर्धन, बापू गोखले, पहिला वाजीराव, वगैरे सर्व सेनानायक एकासारखे एक अप्रतिम याद्ध होते असा त्या त्या ग्रंथकारांचा सांगण्याचा झोंक असतो. आतां पहिल्या बाजीरावाच्या बरोबरीला ह्यांपैकी एकहि योद्धा वसवितां येणार नाही हे उघड आहे. तसेच बाजीरावाच्या खालोखाल महादजीच्या तोडीचा ह्यांत एकहि सेनापति नाही. परशरामभाऊ पटवर्धन दुय्यमप्रतीचा सेनानायक होता असे मला वाटते. गोविंदपत बुंदेले व बापू गोखले हे कनिष्ट प्रतीचे सेनापति होत, हे कोणीहि समंजस मनुष्य कबूल करील. बापू गोखल्याने तर कोण्याएका गो-याचे सर्टिफकेट घेऊन ठेविलें होतें! सर्टिफिकेट्या सेनापतीची किती किंमत करावयाची ते मुद्दाम फोड करून सांगितले पाहिजे असें नाहीं ! हे सेनापतित्वासंबंधी झाले. कित्येकांचा पूर्वग्रह मराठे सर्वप्रकारें श्रेष्ठ होते असे दाखविण्याचा असतो; कित्येकांचा ह्याच्या उलट असतो. तेव्हां पूर्वग्रहांना टाळा देणे ही मुख्य गोष्ट होय. ( २ ) भरपूर अस्सल माहिती मिळाल्याशिवाय चरित्र किंवा इतिहासाचा भाग लिहिण्याचा खटाटोप करूं नये. (३) तशांतूनहि लिहावयाचा संकल्पच असेल तर आपल्याला माहिती कोणती नाहीं तें स्पष्ट लिहावें. अस्सल भरपूर लेखसंग्रह जवळ असल्यावांचून जो कोणी इतिहास लिहावयाला जाईल त्याला माहिती नाही असा शेरा पुष्कळच प्रसंगांसंबंधी द्यावा लागेल. (४) अस्सल भरपूर माहितीवरून काही सिद्धांत काढावयाचा तो काढावा. हे चवथें कलम पहिल्या कलमाचेच एका प्रकारचे रूपांतर आहे अशी समजत होण्याचा संभव आहे परंतु, तसा प्रकार नाही. पहिल्या कलमांत पर्वग्रह प्रधान पद्धतीचा निर्देश केला आहे. व ह्या चवथ्या कलमांत पश्चाद्ग्रह प्रधान पद्धतीचा निर्देश केला आहे. पूर्वग्रह मनसोक्त काढिलेलाच असतो. पश्चाद्ग्रह अस्सल भरपूर आध रांतून जात्या जो निघेल तोच घ्यावयाचा असतो. अलीकडे जे इतिहास व चरित्रग्रंथ लिहिले गेले आहेत त्यांत ह्या पूर्वग्रहाच्या पद्धतीचे प्राधान्य विशेष दिसून येतें. कित्येक ग्रंथांतून ह्या दोन्ही पद्धतींची भेसळ झालेली आढळून येते. उदाहरणार्थ, एका ग्रंथांतील