पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कागदपत्र शुद्ध छापले गेले पाहिजेत. त्यांवरून त्या त्या प्रकरणांतील प्रसंगांचा कालनिर्णय केला पाहिजे व नंतर मराठ्यांच्या इतिहासाची इमारत रचण्यास हात घातला पाहिजे. ही पूर्वीची मेहनत होण्याच्या अगोदर मराठ्यांचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला असतां तो नानात-हेनें अपूर्ण व अविश्वसनीय होण्याची वहुतेक खात्री आहे. आजपर्यंत मराव्यांचा इतिहास आपापल्या मतीप्रमाणे संपूर्ण अथवा अंशतः लिहिण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला आहे. शिवाजी, संभाजी, शाहू , बाजीराव, नाना फडणिस, हरिपंत फडके, परशुराम भाऊ पटवर्धन, वापु गोखले, अहिल्याबाई होळकर, मल्हारराव होळकर, गोविंदपंत बुंदेले, महादजी शिंदे, रामदासस्वामी, जयरामस्वामी, वगैरे ऐतिहासिक पुरुषांची चरिने आजपर्यंत छापून प्रसिद्ध झाली आहेत. तसेच मराठ्यांच्या समग्र चरित्राचे इतिहासहि कित्येक बाहेर पडले आहेत. परंतु, ह्या चरित्रांपैकी व इतिहासांपैकी फारच थोडयांत ऐतिहासिक शोध करून व्यवस्थित रीतीने प्रसंगांच्या व पुरुषांच्या महत्त्वाप्रमाणे लिहिण्याचा प्रयत्न केलेला दृष्टीस पडतो. जी काही इतिहासाची साधनें आजपर्यंत छापली गेली आहेत त्यांच्या आधारावर ही पुस्तके तयार केलेली आहेत.आजपर्यंत मिळालेली साधनें कामाला पुरेशी आहेत अशी बहुतेक ग्रंथकारांची तृप्ति झालेली दिसते. बखरीतून सांपडणारा मजकूर ग्रांटडपच्य ग्रंथांतून सांपडणारा आहे;तेव्हां तो ग्रंथकार सर्वस्वी विश्वसनीय आहे असाहि कित्येकांचा ठाम ग्रह झालेला वाचण्यांत येतो ( लक्ष्मणराव चिपळोणकरकृत मराठ्यांचा इतिहास, प्रस्तावना ). ग्रांटडपच्या ग्रंथांतून मिळणाऱ्या माहितीपेक्षा जास्त माहिती काव्येतिहाससंग्रहांतील पत्रांत आली असून डफ्च्या ग्रंथांत बहुतेक सर्व महत्त्वाच्या गोष्टी आल्या आहेत इतकेच नव्हे, तर कित्येकांचा बारीक पाल्हाळहि त्याने केला आहे असेंहि एका ग्रंथकाराचें ह्मणणे आहे ( नातूकृत महादजी चरित्र, प्रस्तावना ). सर्व बखरींचा एकीकृत आधार घेतला असतां तो विश्वासार्ह होतो असेंहि ह्या ग्रंथकाराने प्रतिपादिले आहे. परंतु, ही सर्व विधानें भ्रामक आहेत हे मी ह्या प्रस्तावनेत १७५०पासून १७६१सालापर्यंतच्या इतिहासासंबंधाने तरी साधार दाखवून दिले आहे. माझ्या मते, ग्रांटडफ्चा ग्रंथ बहुत प्रकारें अपूर्ण आहे इतकेच नव्हे; तर कित्येक ठिकाणी तो अविश्वसनीयहि आहे. त्याने मराठ्यांच्या इतिहासांतील बहुतेक प्रसंगांचे वर्णन दिले आहे अशी बिलकुल गोष्ट नाही. आपल्या ग्रंथाचे पहिले सोळा भाग बखरवजा समजावें ह्मणून तो स्वतः लिहितो. १७५० पासून १७६१ पर्यंतचा ग्रांटडपच्या ग्रंथाचा भाग बखरीपेक्षा थोडासा बरा आहे, परंतु ह्यापेक्षा जास्त शिफारस त्या ग्रंथाची करितां येत नाही ह्मणून मागे मी सिद्ध करून दाखविले आहे. असें असून त्याचा ग्रंथ बहुतेक पूर्ण आहे ह्मणून जे कित्येक लोक ह्मणतात तो केवळ गैर समजुतीचा प्रकार आहे. तसेच ग्रांटइफ्चा ग्रंथ आधाराला घेऊन ज्यांनी ज्यांनी ह्मणून चरित्रे किंवा इतिहास लिहिले आहेत त्यांचीहि किंमत ग्रांटडफ्च्या बरोबरच करणे रास्त आहे. आजपर्यंत जितकी ह्मणून चरित्रे किंवा इतिहास मराठीत लिहिले गेले आहेत तितक्यांची व्यवस्था ही अशी आहे. अशी जर व्यवस्था आहे तर मग मराठ्यांचा इतिहास लिहावा