पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाहेर पडले नाही. नाही तर, मल्हाररावासारख्याचाहि समाचार घेण्यास ज्याने मागे पुढे पाहिले नाही त्या माधवरावाने गोविंदपंताच्या वंशजांना शिक्षा दिल्यावांचून सोडिलें असतें असें संभवत नाही. गोविंदपंताच्या वर्तनाची चौकशी करण्यास बाळाजो बाजीरावास स्वास्थ्यहि नव्हतें व वे कहि नव्हता. पानिपत येथील भयंकर वृत्त ऐकून बाळाजीच्या मनानें पराकाष्ठेची धास्ती घेतली व तेव्हांपासून कामकाज बघण्याला त्याचे मन घेईना. ह्या अवधीत बहुतेक सर्व कारभार रघुनाथरावदादा व सखारामबापू ह्या दोघांनी आवरला होता. ह्या दोघांनों सदाशिवरावभाऊला विन्ने आणण्याचे काम चालविले होते असा बळकट संशय घेण्यास कारणे आहेत ( ऐतिहासिकलेखसंग्रह, २५,७१). ह्या विन्ने आणण्याच्या खटपटींत गोविंदपंत व त्यांचे चिरजीव आणि येरडे हे, एकेक किंवा सर्व मिळून एकाच वेळी, किंवा एका पाठीमागून एक, समयानुसार, निरनिराळ्या कार्याकरितां निरनिराळ्या कारणांनी प्रोत्साहित होऊन, सदाशिवरावाच्या विरुद्ध गेले असावे व पुढे केलेली कारस्थानें गोपन करणे सर्वांनाच इष्ट व सोयीचे वाटले असावें असा संशय येतो. उत्तरेकडील सरदारांची मनें कलुषित करण्यास कारण कांही अशी सखारामबापू झाला असें ह्मणण्यास आधार आहे. तसेंच, बाळाजी बाजीराव ज्या दिवशी दिवंगत झाले त्या दिवशी गाद्याचा दंगा होणार होता (लेखांक २८६); त्यांत रघुनाथरावाचं व सखारामबापूचे अंग असावें असा संशय येतो. रघुनाथरावाने हा दंगा जागच्या जागी जिरविला असें जरी पत्रांत लिहिले आहे तत्रापि हीच गोष्ट रघुनाथरावाच्या विरुद्ध पुराव्याच्या रूपाने आणितां येण्याजोगी आहे. सखारामाची कारस्थाने अशीच भूल पाडणारी असत. आपणच दंगा करवावयाचा, आपणच तो मोडण्याचे श्रेय घ्यावयाचे व घटकेत आपण व राजनिष्ठ बनावयाचे, हे सर्व खेळ सखारामाचे होत ! ह्यावेळची सखारामबापूची व रघुनाथरावाची पत्र जर पढें मागें कोठे सांपडली तर त्यांत ह्यासंबंधी उल्लेख अवश्य निघेल असें भविष्य करून ठेवण्यास हरकत नाही. असो. सखारामाच्या कारस्थानाने गोविंदपंताच्या चिरंजीवांचा बचाव झाला हाच संशय दृढ होतो. गोविंदपंताच्या विरुद्ध पुराव्याची पत्रे येरंड्याने जा दडवून व लपवून वाई येथे आपल्या वाड्यांत ठेविली तो हा कालपर्यंत कोणाच्या दृष्टीस पडली नाहीत. पेशव्यांच्याहि ती दृष्टीस पडली नाहीत व ग्रांटडफच्याहि नाहीत. त्यामुळे गोविंदपताचा संशय कोणालाच आला नाही. अर्थात् पानिपतच्या मोहिमेचें मख्य सूत्र कोठे होतें व खरें स्वरूप काय होतें तेंहि आजपर्यंत कळले नव्हते. सध्या ह्या ग्रंथांत छापलेल्या पत्रांच्या द्वारें ह्या स्वरूपाच्या काही भागाचा उलगडा झाला आहे. राहिलेल्या भागांचा उलगडा, मल्हाररावाचा, रघुनाथरावदादाचा व सखाराम भगवंताचा ह्या वेळचा पत्रव्यवहार सांपडे तोपर्यंत, व्हावयाचा नाही. (२१) रघुनाथरावदादाचें व सखारामबापूचें खरें स्वरूप बाहेर पडण्यास संधि मिळाली. सखारामबापूच्या सल्ल्याने रघुनाथरावाने माधवरावाशी लढाई आरंभून राज्याधिकार मिळविण्याचा प्रयत्न केला. सखाराम कलिपुरुष आहे अशी गोपाळराव पटवर्धनाची खात्री झालेली होती. परंतु, बाळाजी बाजीरावाचा सखारामावरती