पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

झालें. ( १७ ) पश्चिमोत्तर प्रदेशांत शिख लोकांची सत्ता रूजून वाढीस लागली. (१८) बंगाल्यात व मद्रासेंत इंग्रजांची सत्ता कायमची स्थापिली गेली. १७६१ च्या पुढे हिंदुस्थानची पातशाही मिळविण्याची चढाओढ इंग्रज व मराठे ह्यांच्यामध्ये लागली. तिची आस्ते आस्ते वाढ १७९६ पर्यंत होत होती. नानाफडणिसाच्या शहाणपणाने इतर संस्थानांप्रमाणे मराठ्यांना इंग्रजांनी गिळले नाही इतकेच कायतें श्रेय नानाच्या मुत्सद्दे. गिरीला देतां येते. परंतु इंग्रजांची संस्कृति मराठ्यांच्या संस्कृतीहून श्रेष्ठ होती. ही गोष्ट लक्ष्यांत आणिली असतां एवढे देखील श्रेय मिळविणे ह्मणजे मोठीच कर्तबगारी करणे होय असें निःपक्षपातानें कबूल करणे भाग पडते व ( १९ ) अबदालीला पानिपतच्या मोहिमेपासून कांहीं एक फायदा झाला नाही. मराठ्यांची हानि झाली खरी; परंतु अबदालीच्यांतहि फारसा राम राहिला नाही. जर त्याच्या अंगी कांहों सामर्थ्य राहिले असते तर तो वावराप्रमाणे हिंदुस्थानांत रहाता. परंतु पानिपतची लढाई झाल्याबरोबर त्याने तडक विलायतेचा रस्ता धरिला. तो दिल्लीचा पातशाहाहि झाला नाही; त्याला पंजाबांतील प्रांतहि मिळाला नाही व त्याला ह्मणण्यासारखी लूटहि मिळाली नाही. एवंच अबदालीने हिंदुस्थानांत येऊन कांहींच साधिलें नाहीं ! ! ! मग त्याने हा खटाटोप कशाकरितां केला ? स्वार्थ त्याने कोणता साधिला? परमार्थ त्याला कोणता लाधला ! "ते के न जानीमहे " ह्मणून कोणी संस्कृत कवि आश्चर्याने उद्गार काढतो ते खरे आहेत. (२०) गोविंदपंताच्या पुत्रांना किंवा अनुयायांना पानिपतच्या मोहिमेंत व लढाईत कुचराई केल्याबद्दल काही एक प्रायश्चित मिळाले नाही. योग्य चाकरी न केल्यास पुढे लढाई झाल्यानंतर फार कठीण जाईल वगैरे धमकीची पत्रे सदाशिवरावाने गोविंदपंताला लिहिली होती. परंतु गोविंदपंताची हरामखोरी बाळाजी वाजीरावाला माहीत नसल्यामुळे, १६ जानेवारी १७६१ ला ह्मणजे पानिपतची लढाई होऊन तीन दिवसांनी व गोवंदपंत वारल्यापासून २५ दिसांनी बाळाजी बाजीरावाने गंगाधरपंताला समाधानाचे पत्र पाठविलें, त्यांत गोविदपंताची तारीफ केली होती ( मराठ्यांचे पराक्रम, पृष्ठ १४७ ). ह्यावरून असे दिसतें की सदाशिवरावभाऊनें व नारो शंकराने मोहीम होत असतांना गोविंदपंताला पाठविलेली पत्रे १६ जानेवारी १७६१ पर्यंत पेशव्यांच्या नजरेस पडली नाहीत. पुढेहि कधी ही पत्रे पेशव्यांच्या नजरेस पडली नाहीत. पानिपतची में हीम चालू असतां सदाशिवराव भाऊची, नारो शंकराची, वाळाजी बाजीरावाची व इतर लोकांची गोविंदपताला आलेली सर्व पत्रे येरंड्यांच्याजवळ राहिली. ही पत्रे येरंडय च्या हातांत येण्याचे कारण नक्की काय असावें तें कळत नाही. परंतु गोविंदपंताच्या विरुद्ध पुरावा ह्मणन यरंडयांनी त्यांचा ताबा घेतला असावा असा तर्क करणे साहजिक आहे. पानिपतची मोहीम झाल्यावर, खरें मटले असतां, गोविंदपंत बुदेल्याचे कृष्ण कारस्थान बाहेर पडावयाचे. परंतु यरंड्यांची गोविंदपंताच्या चिरंजीवांनी मूट दाविली ह्मणा किंवा रघुनाथरावदादा व सखारामपत वोक ल ह्यांच्या अंतस्थ मसलतीने ह्मणा, गोविंदपंताचें हे बेंड