पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्यांनी ह्या बाबतीत प्रावीण्य संपादण्याचा प्रयत्न केला ही अभिनंदनीय गोष्ट आहे. उदगीरच्या लढाईत तोफा मारून मराठ्यांनी मोगलाला खाली पाडिले व तोफा मारूनच अबदालीलाहि चीत करण्याचा त्यांचा विचार होता. हा विचार बहुशः सफल झाला असतां; परंतु, गोविंदपंत बुंदेल्याने व मल्हारराव होळकरानें हरामखोरी केल्यामुळे ह्या सफलतेस दिरंग लागला. आता हे गाडदी मराठ्यांना कितपत मानवले ते पाहण्यासारखे आहे. १७५० त सलाबताने व १७५१ त मराठ्यांनी गाडदी ठेवण्यास प्रारंभ केला. १७५३ त गाडद्यांचा मुख्य जो बुसी त्याने सलाबताला निर्माल्यवत् केले. १७५९ त श्रीरंगपट्टणांतील गाडद्यांचा मुख्य जो हैदर त्याने श्रीरंगपट्टणची गादी बळकाविली. १७६१ त बाळाजीच्या मृत्यूच्या दिवशी पुण्यांत गाडदी दंगा करणार होते (लेखांक २८६ ). १७७३ त गाडद्यांनी नारायणरावास ठार मारिलें. येणेप्रमाणे यूरोपियन कवाईत शिकलेले गार्दी लोक हिंदुस्थानांतील देशी राजांना चांगलेसे मानवले नाहीत हे उघड आहे. विदेशी लोकांची पथके प्रसंगानुसार धन्याच्या उरावरहि बसण्यास मागे पुढे पहात नाहीत ह्याचा अनुभव प्रिटोरियन गाडद्यांनी रोमच्या पातशाहांस व जानिझारीनीं तुर्कस्थानच्या पातशाहांस जसा आणून दिला तसा मराठ्यांसहि लवकरच आणून दिला. इंग्रजांच्या हाती महाराष्ट्र गेले नसते तर ह्या गाद्यांच्या हातांत ते पुढे मागे गेल्याशवाय राहिले नसते असा माझा तर्क आहे. ह्या गाडद्यांचे स्तोम महाराष्ट्रांत पुढे पुढे तर फारच वाढले. बहुतेक सर्व लहान मोठ्या सरदारांच्या पदरी गाडदी असत. खुद्द नानाफडणिसाच्या मेणवलीस गाडद्यांचा पाहरा असे. देशी शिपाई टाकून विदेशी शिपाई जवळ ठेवण्यांत मोठीशी मुत्सद्देगिरी होती असें नाहीं! विवेचन सातवे. पानिपतच्या लढाईचे परिणाम काय झाले ? तर (१) प्रथम नराठ्यांचे पाऊल आंत आले. (२) नजीबखानाला आपला प्रांत व दिल्लीचे काही वेळ पुढारपण मिळाले. (३) होळकराची पेशव्यांची धोत्रे बडविण्याची भीति नाहीशी झाली. (४) सुजाउद्दौल्याला अयोध्या, काशी, प्रयाग वगैरे प्रांतांत मराठ्यांचा उपद्रव पुन्हां झाला नाही. ( ५ ) रोहिलेहि मराठ्यांच्या कचाटीतून सुटले. (६) जानोजी भोसल्याचे काही वेळ वजन वाढले. (७) गायकवाड जिवंत राहिले. (८) जजिन्याच्या हबशाला दम आला. (९) दिल्लीच्या पातशाहाचे दैन्य दुणावले. (१०) स्वामिभक्त शिंद्यांना गेलेली सत्ता पुन्हां स्थापण्याची दवार मेहनत पडली. (११) पुंड, पाळेगार व मवासी ह्यांना दंगे करण्यास अवधि मिळाला. (१२) सलाबतजंगाचा प्रधान निजामअल्ली ह्याला गेलेला प्रांत मिळविण्याचा हरूप आला. ( १३ ) मराठ्यांच्या ताब्यांत श्रीरंगपट्टण जावयाचें राहन हैदरअल्लोला तेथे आपली सत्ता स्थापितां आली. (१४) रजपत संस्थानिकांना काही एक न मिळता उलट पढे मराठ्याकड़न जाच मात्र जास्त झाला. (१५) सातारच्या छत्रपतींचें नांव समूळ नाहीसं व्हावयाचं ते झाले नाही. ( १६ ) सातारची व कोल्हापूरची गादी जोडण्याचे काम तहकुब