पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अठराव्या शतकांतील पश्चिम यूरोपांतील संस्कृतीची व महाराष्ट्रातील संस्कृतीची तुलना करू पहातां शेंकडों भेद दृष्टीस पडतात. पैकी काहींचाच उल्लेख करणे येथे इष्ट आहे. (१) मराठ्यांच्या संस्कृतीत प्रथम व्यंग मटले ह्मणजे त्यांना छापण्याची कला माहीत नव्हती व ती माहीत करून घेण्याचा त्यांनी कधी प्रयत्नहि केला नाही. १४९८ च्या ११ मेला गामाने हिंदुस्थान शोधून काढिले. तेव्हापासून १७६० पर्यंत फिरंग्यांच्या व मराव्यांच्या मलाखती अनेक ठिकाणी झाल्या. गोमांतक, सांवतवाडी, वसई, कोची, दाभूळ, दिव, दमण वगैर स्थली मराठ्यांच्या फिरंग्यांशी गांठी पडलेल्या आहेत. वलंदेज (डच् ) व डिंगमार (डेन ) ह्या लोकांनाहि मराठे ओळखत असत. मसावूसी वगैरे फ्रेंच लोकांशी तर मराठ्यांची चांगलीच घसट असे. मुंबई, सुरत, बाणकोट, विजयदुर्ग, राजापुरी, दाभोळ वगैरे ठिकाणी इंग्रजांचीहि जानपछान मराठ्यांना झाली होती. मुंबईतील परभू, शेणवई, पारशी, भाटे व वाळुकेश्वरचे छत्रे, भातखंडे वगैरे ब्राह्मण पजारी व बैरागी इंग्लिश लोकांशी हरहमेश दळणवळण ठेवीत. कित्येकांना चांगलें इग्रजी लिहितां व बोलतां यत असे. त्यांनी छापील पुस्तकें पाहिली होती ह्यांत संशय नाही. नानाफडणिसाच्या दफ्तरात छापील इंग्रजी नकाशे अद्यापहि आहेत. मोरोबादादाच्या घरच्या पुस्तकालयांत एक इंग्रजी चोपड़ी होती असें त्याच्या पुस्तकांच्या यादीवरून कळते. असे असून ह्मणजे यूरोपांतील सर्व देशचे लोक त्यांच्या दारी उभे असन, मराठ्यांनी छापण्याची कला कशी घेतली नाही ह्याचे मोठे आश्चर्य वाटते. मराठ्यांच्या वाढत्या साम्राज्यांत योग्य कल्पनांचें बी पेरण्यास ह्या कलेचाच प्रवेश महाराष्ट्रांत झाला पाहिजे होता. घोरपडे, शिंदे, होळकर, भोसले, कोल्हापूरकर, सांवत, आंग्रे वगैरे सरदारांच्या पदरी फिरंगी, फराशिस, इंग्रज वगरे बरेच देशच लाक पेशवाई जाईतोपर्यंत व पढ़ें देखील होते: असें असन ज्याअर्थी मराठ्यांनी ही कला उचलली नाही त्याअर्थी त्यांच्या ग्राहकशक्तीच्या कीतीला बराच कमीपणा येतो हैं निविवाद आहे. (२) मुद्रणकलेसारखा उघड उघड डोळ्यावर येणारा गण ज्या लोकाच्या ध्यानात आला नाही त्यांचे भगोलाचें व इतिहासाचें ज्ञान कोने असावें ह्यांत मा नवल नाहा. (३) परंतु ज्या वस्तंची मराठ्यांना दर घडीस अत्यंत जरूर लागत असावा असा आपण तके करितों त्यांपैकीहि कांहीं वस्त मिळविण्याची मराठ्यांनी इच्छा दशावला नाही व प्रयत्न केला नाही. घळपांना व आंग्रयांना लोहचंबकाची व तारवें बांधण्याच्या गाद्याचा जरूर विशेष होती. ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी इंग्रजांच्या गलबतांतन व मंबईत पाहिल्या हात्या. परतु, त्या स्वत: बनविण्याची उत्कट इच्छा त्या प्रांतांतील लोकांना किंवा पुणे येथाल मुत्सद्यांना झाली नाही हे मोठ्या कष्टानें कबूल करावे लागते. ह्या इतक्या बाबींत मराठयाच पाऊल मागे होते. परंत (४) एका बावीत त्यांनी आपली ग्राहकशक्ति चांगली दाखविली होती. ती बाब पटली ह्मणजे कळेच्या तोफा व कवायता सैन्य ठेवण्याची तयारी हा हाय. ह्या कामी युरोपियन लोकांची श्रेष्ठता मराठ्यांनी पाहिली होती. तेव्हां केशवराव पानशी, इभ्राईमखान आणि मुजफरखान गाडदी ह्या इसमांकडून