Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६३ )

फ्रान्सचा भयंकर प्रतिस्पर्धी जो स्पेन त्याला जगांतील ख्रिस्तेतर लोकांवर आपला हक्क सांगत येऊं नये, ह्मणून प्रतिक्रियेच्या नांवाखालीं क्याथलिक धर्मातील मुख्य धर्मगुरूच्या हस्तें, कंप- त्यांची घटना करण्यात आली होती. रिचेल्यू नंतर माझारीन हा फ्रान्सचा प्रधान झाला; आणि त्याच्याही कारकीर्दीत, रिचेल्यूप्रमाणेच समुद्रापलीकडील देशांत व क्याथलीक लोकांकडून " प्रभूच्या नांवावर " स्पेनला तोडीस तोड ह्मणून वसाहती स्थापन करविणे, हेंच सतराव्या शतकाच्या पहिल्या अर्ध-भागांन फान्स देशाचें वसाहतीविषयक चाचनीचे मुख्य तत्व ठरून गेलेलें होतें, ह्मणजे यावेळी फ्रान्समध्यें धार्मिक कल्पनांचे अतिशय स्तोम माजलें होतें; व त्याचे वसाहतीविषयक बाचतीवर विचातक परिणाम घडत होते; पुढे अठराव्या शत- कांतही कास धार्मिक धोरण हिंदुस्थानांतील त्यांच्या राजकीय उत्कर्षास असेंच विघातक झाले; फ्रान्समध्यें पूर्वी सूनच परदेशांन वसाहती स्थापन करण्याच्या विरुद्ध एक पक्ष अस्ति- त्वांत होता; आणि या शतकाच्या पूर्वार्धत त्या पक्षाचा व्हाल्टेयर हा प्रसिद्ध लेखक प्रमुख बनलेला होता. त्याने फान्सच्या हातून कानडा देश गेला यांत फान्सचा कांहींही तोटा झाला नाहीं हा फ्रान्सचा फायदाच झाला, असे उघड उबड बोलून दाखविलें. थोड्याशा कमी- अधीक बर्फाच्छादित जमीनांच्या तुकड्याकरितां लढाया करण्याच्या मूर्खपणाबद्दल त्यानें तेथील सरकारचा उपहास केला; आणि पारीस व लंडन येथील रहिवाशांकरितां बुंद, तपकीर आणि मसाला ही निळविण्यासाठी केलेल्या रक्तपाताबद्दल त्याने दुःखही प्रदर्शित केले; त्या- नंतर - लायल याच्या ह्मणण्याप्रमाणे त्या शतकाच्या उत्तरार्धीत फ्रान्समधील मुत्सद्दी लोकांच्या आणि तेथील लेखकांच्या मनावर तात्त्विक राजकीय विचारांचा अधिक परिणाम झाला. तेव्हां रुतो यांनी ऐषाराम व अर्वाचीन सुधारणा, यांगसून भ्रष्टतेरा नेणारे परिणाम उत्पन्न होतात, असें ह्मणून व मोठमोठे दांडगे लेख लिहून त्याच बाजूचें समर्थन केलें; आणि जरी ह्या लेखकांच्या वर लिहिलेल्या गोष्टीकडे पाहण्याच्या दिशा भिन्न भिन्न असत, तरीही धार्मिक अधिकाऱ्यांची महत्वाकांक्षा, आणि त्यांनीं आपल्या मतांचा व तत्त्वांचा विस्तार करण्याकरिता अनियंत्रित मार्गाने चालविलेले ढोंगवत्तरे, यांवर कधी तेजोभंग करणारे उपरोधिक वाकूप्रहार करण्यांत, तर कधीं निराशेमुळे आपली निव्वळ नापसंती दाखविण्यांत, त्या सर्वांचें एकमत होतें. कानडा देशांत नानाप्रकारच्या धार्मिक पंथांची सत्ता पुष्कळच जोरात होती; त्यामुळे धार्मिक हितसंबंधाचा राजकीय हितसंबंधावर अतिशयच पगडा असून त्यामुळे तेथील फ्रेंच गव्हर्नरची सत्ताही पुष्कळवेळा दाबली जात असे; त्याप्रमाणेंच इकडे हिंदुस्थानांत सुद्धा जेसुइट लाहुर याने रचलेली दुर्देवी लालविरुद्धची कारस्थानें ही त्याचा बदलौकिक आणि नाश घातुकरीतीने जवळ जवळ ओढून आणण्याला कारणीभूत झाली होती, ही महत्वाची गोष्ट लक्षांत घेण्यासारखी आहे. उलटपक्षों, ज्यावेळी फ्रान्समध्यें