धार्मिक मतमतांतराच्या स्पर्धेमुळे उत्पन्न झालेल्या वैमनस्याचें राजकीय वर्चश्वप्राप्तींत रूप- तर होऊन त्यामुळे परस्परांनी एकमेकांस कसें निर्बळ करून घेतलें, आणि त्यानंतर राज- कीय स्थित्यंतर वरचेवर घडून येण्यास तीच निर्बलता कशी कारणीभूत झाली वगैरे बाबतींचें योग्य अनुमान कोणासही सहज करता येईल असे मानणे चुकीचे होणार नाहीं.
दक्षिण हिंदुस्थानांत या काळांत मुसलमान लोकांतील आपसांतील धार्मिक मत- भेदामुळे ज्याप्रमाणे निरनिराळीं राजकीय स्थित्यंतरे घडून येऊन त्याचा फायदा मराठे व मोगल यांना मिळाला तसाच फायदा पुढील काळात पोर्तुगीज व फ्रेंच लोकांविरुद्ध इंग्रज लोकांना हिंदुस्थानांत मिळाला आहे; आणि तुलनात्मकदृष्ट्या त्यासंबंधीचे विवेचन, मोठें मनोरंजक, बोधप्रद व मननीय असल्यानें तें याठिकाणी अगदी थोडक्यांत केले आहे. हिंदुस्थानांत इंग्रजांना पहिल्याने पोर्तुगीज व नंतर फ्रेंच या दोन युरोपियन राष्ट्रांशी झगडावें लागले. त्यात पहिल्याने पोर्तुगीज लोकांशी युद्धकलह झाले, परंतु ते व्यापारविषयक याचतीवरून झाले; त्या काळांत पोर्तुगीज लोकांचें व्यापारी वर्चस्व परमावधीस गेलें होतें; परंतु इतर अनेक कारणाबरोबर त्यांनी हिंदुस्थानांत जे धार्मिक जोरजुलूम केले, तेही एक महत्वाचे कारण होऊन, त्यांच्या वर्चस्वाची हानि झाली; उलटपक्षी इंग्रज लोकांनी पहिल्या- पासुनच धार्मिक बाबतीत उदार व दिलदार वर्तन ठेविल्यामुळे, पोर्तुगाज लोकांप्रमाणे त्यांच्याविषयों अति उत्पन्न न हातां, त्यांचा अतिशय फायदा झाला; त्यानंतर इंग्रजांचा फ्रेंच लोकांशी संबंध आला; आणि हिंदुस्थानच्या राजकीय रंगभूमीवरील वर्चश्वाचें बक्षीस मिळविण्याकरिता उभयतांमध्ये मोठ्या जोराची व चिकाटीची स्पर्धा सुरू झाली. तथापि त्याबरोबरच फ्रान्समधील धार्मिक वातावरणाचाही हिंदुस्थानांतील फ्रेंचांच्या राजकारणावर अत्यंत विघातक व इंग्रजांना अत्यंत फायदेशीर असा परिणाम झाला. इ० सन १६२४ मध्ये रिचल्यू हा फ्रान्सचा प्रधान झाल्यानंतर पश्चिमेकडील कानडा देशापासून तो तहत मादागास्कर आणि ईस्टइंडिजपर्यंत जगांतील निरनिराळ्या भागांत क्रमाक्रमाने वसाहत करणान्या मंडळांच्या स्थापना व वाढ करणाऱ्या सनदा एकामागून एक देण्यांत आल्या; आणि जुन्या राजसत्तेवारी स्थापन झालेल्या फ्रेंच वसाहतींना दिलेल्या सन्दांमध्ये जीं त आणि हेतू मधिन करण्यांत आले होते, तेच ह्या नव्या सनदांमध्येही स्पष्टपणे नमूद करण्यांत आले होते. पण लक्षांत ठेवण्यासारखी महत्वाची गोष्ट ही आहे कीं, इंग्लंड आणि हॉलंड यांच्या व्यापारी दप्तरामध्ये त्यांचा मागमू मही नव्हता. शिवाय त्यावेळी रोमन क्याथलीक धर्माचें महत्व वाढून इतर सर्व धर्माना कडक बहिष्कार घालण्यांत आला होता; पण उलटपक्षी धर्मोत्तर केलेल्या विधर्मी- यालाही फ्रेंच नागरिकांचे सर्व हक्क मिळत होते. शिवाय या स्वान्यांचा मुख्य उद्देश वसाहती स्थापन करण्याचा होता; तरी त्याला धर्मप्रसार हीही एक तितकीच महत्वाची पुरवणी जोड- ण्यांत आली होती व समुद्रापलीकडील विस्तीर्ण प्रदेश एकसारखा बळकावीत चाललेला