परदेशांतील व्यापार आणि दुरवरच्या वसाहती हातांतून गेल्यामुळे झालेल्या नुकसानीबद्दल तेथील लोक भूतदयेच्या वेदांतस्वाच्या नवीन उत्पन्न झालेल्या कल्पनांनीं आपलें शांतवन करून घे होते; त्याचवेळीं, इकडे इंग्लंडमध्यें अठराव्या शतकांत प्रचलित असलेल्या उदार विचारस्वातंत्र्याचा व उदात्त प्रगतिपर कल्पनांचा परिणाम आशियांनील- हिंदुस्थान/- तील इंग्लिशांच्या राज्यविस्तारावर उलट न होतां कांहींसा फायदेशीरच होत होता. व्यापा- रापासून ज्याप्रमाणें धार्मिक आणि राजकीय बाबतीत सर्व जगभर स्वतंत्र विचार उत्पन्न झाले, त्याप्रमाणेच त्यामुळे उत्पन्न झालेली उदारमतें, आणि कार्यकारणभाव पाहून वाग- ण्याची पद्धति, यांनीही आपल्यापरीने व्यापाराला बरीच मदत केली. कारण ज्या चुकांनीं व दुराग्रहांनीं स्पेन, पोर्तुगाल व अंतश: फ्रान्स, यांच्या व्यापाराच्या साहसी व्यव सायाला धक्का बसला होता, त्या चुका होण्यापासून त्यामुळे इंग्लंडवें राष्ट्र अलिप्त राहिले. अठराव्या शतकाच्या मध्यार्धांच्या सुमारास इंग्लंडच्या हिंदुस्थानांतील दिग्विजयांना सुरवात झाली होती; आणि त्या शतकाच्या अगदी शेवटी शेवटीं झालेला अत्युत्तम इतिहासकार जो लेके याच्या हाणण्याप्रमाणे, ( Lecky's History of England in the eigh• teenth Century. हे पुस्तक पहा. ) " त्यावेळी सुशिक्षित समाजामध्यें धार्मिक चावती चोकडे व्यापक प्रमाणावर तटस्थवृत्ति पसरलेली असून त्यांत नास्तिकपणाचीही थोई शी छटा दृग्गोचर होत होती. " ( A latent Scepticism and a wide spread indifference might be everywhere traced among the cultivated classes ") स्वयमीतील मतमतांतरं समान दृष्टीने पाहण्याची संवय झाली ह्मणजे परधर्मीयांना आपल्या धर्मपंथाची दीक्षा देण्याचा प्रयत्न करण्याच्या भानगडीत कोणीही पडत नाहीं; आणि त्याप्रमाणेंच मूर्तिपूजक समाजाशी व्यवहार करि- तांना धार्मिक आणि ऐहिक हितसंबंधाचा घोटाळा उडण्याला काहींही जागा रहात नाहीं. हिंदुस्थान देशाच्या ह्या धार्मिक वातावरणामध्यें यरोपियन लोकांना यापेक्षा अधिक योग्य अशी मानसिक तयारी मिळगे शक्य नव्हनें, आणि धार्मिक वर्चस्वाला बळी पडून केलेलें एखादे कृत्य अथवा राजकीयदृष्ट्या गैर असलेले एखाद्याचें सख्तीने धर्मातर करविल्याचें उदाहरण इंग्लिश ईस्टइंडिया कंपनीच्या कट्टया हाडवैन्यांनाही आजपर्यंत दाखवितां आलें नाहीं. -लणजे सर्व बाजूंनी विचार केला असता हिंदुस्थान देशांत आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याकरितां - पहिल्याने युरोपियन व नंतर एतद्देशीय सत्ताधान्यांबरोबर - झगडत असतांना इंग्लिश ईस्टइंडिया कंपनीला जीं कित्येक नैतिक स्थित्यंतरें फायदेशीर झाली, - आणि ज्या फायद्यांचा पुढे इंग्लिशांच्या राज्यविस्तारांतही अतिशय महत्वाचा व मोल्यवान् उपयोग झाला, त्यापैकीच त्या काळांतील इंग्लिश लोकांची शांत आणि दिलदार वृत्ति हेही एक कारण होतें, अर्से झणण्यास हरकत नाहीं.
पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/९१
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६४ )