Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६० )

सोपविली, त्यावेळीं तो स्वतः दानियलबरोबर बऱ्हाणपूर येथें आला होता; अकबर बाद शहाचे तीनही मुलगे-सलीम, मुराद व दानियल हे तिघेही मुलगे मद्यपि निघाले; आणि दानियलचें विजापूरकर बेगम सुलताना हिच्याशी लम झाल्यानंतर लवकरच, ( ता० ८ एप्रील इ० सन १६०५ ) तो ब-हाणपूर येथेंच मयातिरेकानें मृत्यू पावला; त्यामुळे अक- बराच्या शोकपरंपरेत भर पडली; तो हताश बनला; पूर्ण निराश झाला; भागांवुन गेला; न्याला सर्व जग अंधारमय दिमूं लागलें; त्याच्या सर्व आशा नष्ट होऊन तो शून्यमय बनला आणि त्याच वर्षाच्या सप्टेंबर महिन्यांत अंथरुणास खिळून ता० १५ आक्टोबर रोजी तो आपा येथें मृत्यू पावला; व सलीम ऊर्फ जहांगीर हा गादीवर आला. यावेळी फेरिस्ता याची विजापूर दरबारातून तिकडे वकील ह्मणून रवानगी करण्यांत आली; त्याचं कारण काय असावें हें नका समजत नाहीं; पण अकबराच्या मृत्यूबद्दल दुःख प्रदर्शित करून जहांगीर शांतवन करण्याकरितां आणि त्याच्या राज्यारोहणाबद्दल त्याचें अभिनंदन करण्याकरितां, त्यास वकील ह्मणून तिकडे पाठविण्यांत आलें असावें, असें अनुमान निघते. यावेळी जहांगीर हा काश्मीरमध्ये हवा खाण्यात जात असून मार्गात लाहोर येथे त्याची छावणी पडली होती. त्याठिकाणी जाऊन फेरिस्ता त्यास भेटला. ( इ० सन १६०६ या वर्षी यावेळी प्रसिद्ध फ्रेंच प्रवासी बर्नियर हा जहांगीरच्या स्वारीबरोबर होता. ) आणि आपली कामगिरी संपवून तो विजापूर येथे परत आला.

 फेरिस्ता याने ६० सन १५९६ मध्ये ह्मणजे विजापूरच्या आदिलशाही राज्याचा इतिहास लिहून पूर्ण केल्यानंतर " नवरसनामा " या नांवाचा एक इतिहास लिहिला त्यांत निजामशाही वगेरे राज्यांची इ० सन १६११ पर्यंतची हकीकत दिलेली आहे; आणि यतिचं त्या वर्षो सुरत येथें पोर्तुगीज व इंग्रज लोकांच्या वखारी असल्याचा उल्लेख केला आहे. गजे इ० सन १६११ च्या पुढील माहिती त्यांत नाही. त्यावरून त्यानंतर लव- करच तो मृत्यू पावला असावा, असे अनुमान निघते.

 फेरिस्त्यानें हिंदुस्थानातील मुतलमानी राज्यांचा - विशेषत: दक्षिणेतील मुसलमानी राज्यांचा इतिहास लिहिलेला असून त्याचे अनेक तर्जुने झालेले आहेत; आणि फेरिस्त्याच्या इतिहासाची उत्तमांत गणना होत असून, मुसलमान इतिहासकारांमध्ये व्यास आजतागायत श्रेष्ठ स्थान देण्यांत येत आहे.

 वरील एकंदर हकीकतीवरून, निजामशाहीत सुनीपंथाचें विशेष प्राबल्य कसें होतें, शिया, सुनी व महूदी वगेरे पंथभेदांमुळे राजकीय परिस्थिति किती घोटाळ्याची झाली होती; आणि नगर, विजापूर व गोवळकोंडें या राज्यांत कशा मानगडी होत राहिल्या होत्या हें कोणाच्याही सहज लक्षात येईल; पुढील काळात निजामशाहीत शिया व सुनी हे दोन्ही पंथ मार्गे पडून महूदी पंथ जोरात आला, आणि जमालखानाचा नाश झाल्यावरच त्या