परंतु शहाने त्यास 86 मला कोणताही प्रश्न यावेळीं येथें न विचारितां तुला जर माझ्या बरोबर यावयाचे असेल तर चल; " असें सांगितले; तेव्हां इलिसखानही आपणांबरोबरील शंभर स्वारांसह शहाबरोबर गेला आणि त्याच रात्री इतरही अनेक सरदार शहास येऊन मिळून त्याच्याजवळ एकंदर तीन हजारपर्यत सैन्य जमले. - फेरिस्ता ह्मणतो की, याचवेळी मीही शहास जाऊन मिळालों. अशारीतीने शहा मोकळा झाल्यावर लवकरच दिलावरखानाचे सर्व महत्व नष्ट झालें; तथापि त्याने शहात पकडण्याची व आपले वर्चस्व पुन्हां प्रस्थापित करण्याची अतिशय धडपड केला; परंतु व्यति त्यास यश न येता उलट आपला जीव बचा- aण्याकरितां त्यास अहमदनगर येथे पळून जावे लागले; परंतु तेथेही त्यास थाग न मिळाल्या. मुळे तो कोठे तरी आश्रय मिळविण्याकरितां भटकत फिरूं लागला. इकडे इबाहामशहाही स्वस्थ बसला नव्हता, त्यानें दिलावरखानाच्या हालचालीवर पाळत ठेविला; त्यास फसवून पकडून विजापूर येथें आणि त्याला पूर्ण निरुपद्रवी बनविण्याकरितां दोन्ही डोच्यांनी आंधळे केले; आणि त्याची सातारा येथील किल्ल्यांत प्रतिबंधांत रवानगी केली व त्याच ठिकाणी तो पुढे दहा वर्षांनी आपल्या वयाच्या ९० व्या वर्षी इ सन १६०६ मध्ये मृत्यू पावला.
त्यानंतर बरीच वर्षे फेरिस्त्याच्या नांवाचा उल्लेख आढळत नाहीं; त्यावरून याच काळांत त्यानें दक्षिणेतील मुसलमानी राज्यांचा इतिहास लिहिण्यास प्रारंभ केला असावा असें दिसतें, तो ह्मणतो:- " मला इतिहास लिहिण्याला मुबलक साधनसामुग्री मिळवून देण्यांत इब्राहिम आदिलशहा याने पाण्यासारखा पैसा खर्च केला. " अशाप्रकार फरिश्यास राजाश्रय मिळून त्यानें आपल्या वयाच्या २६ व्या वर्षी इ० सन १५९६ मध्ये विजापूर येथील आदिलशाही राज्याचा इतिहास लिहून पूर्ण केला, अकबर बादशहाचा दुसरा मुलगा दानियल मिर्झा यास, त्यानें इ० सन् १५९९ मध्ये दक्षिणप्रांताचा सुभेदार नेमून तिक- डील कामगिरी सोपविली होती; व त्याप्रमाणे तो बन्हाणपूर येथे येऊन दक्षिणप्रांताचा कार- भार पहात होता. या शहाजाद्याबरोबर विजापूरकर इ. हीम आदिलशहा याची कन्या नामें बेगम सुनाना हिचा विराह ठरला; त्यावेळी विजापूर येथून अहमदनगर येथे त्या राज- कन्येस सांभाळून नेण्याची महत्वाची व जबाबदारीची कामगिरी इब्राहीमशहाने फेरिस्ता याजकडे सोपविली होती हैं लम गोदानीरी मंगापैठण येथे इ. सन १६०४ मध्ये झाले; त्यावेळी फेरिस्ताही त्याठिकाणी हजर होता; आणि दानियल याने त्यास आग्रह केल्यावरून तो शहाजादीच्या परिवाराबरोबर बऱ्हाणपूर येथें तिला पोहोचविण्यास जाऊन व तेथे काहीं दिवस त्या उभयतांचा पाहुणचार घेत गहून, नंतर तो पुन्हा विजापूर येथें परत आला होता.
अकबर बादशहाचा हा मुलगा, झणजे दानियल - हाच त्याच्या बाकीच्या सर्व मुलांच्या मानानें विशेष हुषार व कर्तृत्ववान् होता; आणि सर्व मुलांत हाच अकबराचा अतिशय लाडका असून ६० सन १५९९ मध्ये जेव्हां अकबराने त्यास दक्षिणेची कामगिरी